सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

यांत्रिकीकृत स्वच्छतेसाठी राष्ट्रीय कृती योजनेची (NAMASTE) परिसंस्था


मैला वाहून नेणा-यांच्या कामाचे स्वरूप बदलून  पुनर्वसन करण्‍याचे योजनेचे उद्दिष्ट्य 

Posted On: 25 AUG 2023 2:30PM by PIB Mumbai

 

हाताने मैला उचलणाऱ्यांच्या (SRMS)  पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार योजना आखण्‍यात आल्या आहेत आणि त्याचबरोबर  इतर प्रयत्नांद्वारेहाताने मैला उचलणाऱ्यांची संख्या कमी करणे आणि ही प्रथा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सरकार नमस्तेया राष्ट्रीय कृती योजनेतून करणार आहे.  गटारे आणि सेप्टिक टाक्यांच्या धोकादायक साफसफाईमुळे गटार/सेप्टिक टाकी संबंधित कामे करताना कर्मचारी बांधवांचा  मृत्यू झाल्याच्या वेळोवेळी बातम्या  येत असतात. अशी प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 लाख रुपयांच्या भरपाईसाठी संबंधित राज्य सरकारकडे विचारात घेतली जातात. धोकादायक साफसफाई दूर करण्यासाठी, गटार आणि सेप्टिक टँक कामगारांचे मृत्यू थांबवण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (MoSJE) आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) यांनी संयुक्तपणे "यांत्रिकीकृत स्वच्छतेसाठी राष्ट्रीय कृती योजना परिसंस्था’’ -  (NAMASTE)   तयार केली आहे. ही योजना 2025-26 पर्यंतच्या तीन वर्षांमध्ये 349.70 कोटी रुपयांच्या खर्चासह देशातील सर्व 4800 पेक्षा जास्त  शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे.

 

नमस्ते योजनेतील घटक :

1. निर्देशित कुशल कामगारांचे (एस एस डब्ल्यू) प्रोफाईल: NAMASTE मध्ये गटार/सेप्टिक टँक कामगारांच्या संक्षिप्त  प्रोफाइलिंगची कल्पना आहे.  निर्देशित कुशल कामगारांची यादी संबंधित  शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून  प्राप्त केली जाईल आणि त्यानंतर त्यांचे तपशीलवार प्रोफाइलिंग शिबिरांद्वारे केले जाईल.

2.  निर्देशित कुशल कामगारांना व्यावसायिक सुरक्षा प्रशिक्षण आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (PPE) संचाचे वितरण.

3. धोकादायक स्वच्छता कार्यांसाठी स्वच्छता प्रतिसाद तुकड्यांना  (एसआरयू)  सुरक्षा उपकरणांसाठी सहाय्य.

4. आरोग्य विमा योजनेच्या लाभांचा विस्तार करणे: ओळखल्या गेलेल्या  निर्देशित कुशल कामगारांना  आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षाछत्र प्रदान करण्यासाठी, त्यांना आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) या अंतर्गत समाविष्ट केले जाईल. हाताने मैला उचलणाऱ्यां  आणि  निर्देशित कुशल कामगारांच्या कुटुंबांसाठी  आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा  हप्ता  "नमस्ते" अंतर्गत भरला जाईल.

5. उपजीविका सहाय्य: कृती आराखडा यांत्रिकीकरण आणि उद्योग विकासाला चालना दिली जाईल.

6. यादीत समाविष्ट  हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या   आणि त्यांच्यावर अवलंबितांना 3000 रुपयांच्या मासिक विद्यावेतनसह दोन वर्षांपर्यंत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल.

7. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय  आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय  यांच्या  कार्यक्रमांचे अभिसरण: निर्देशित कुशल कामगारांची  सुरक्षा ही  सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय  आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय  यांची संयुक्त जबाबदारी आहे.

8. आयईसी  मोहीम: नमस्ते मोहिमेच्या  प्राधान्य क्रमाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी  शहरी स्थानिक स्वराज्य संस्था  आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळद्वारे संयुक्तपणे मोठ्या मोहिमा हाती घेतल्या जातील.

9. एमआयएस आणि वेबसाइट: नमस्तेसाठी समर्पित वेबसाइटच्या मदतीने मजबूत एमआयएस अंमलबजावणी आणि देखरेख केली जाईल.

मागील 9 वर्षांमध्ये  हाताने मैला उचलणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार योजनेअंतर्गत मिळवलेल्या खालील यशासाठीची माहिती देण्यासाठी लिंक तयार  केली गेली आहे. 

विशेष वैशिष्ट्यांसाठी लिंक, नमस्ते योजना लागू करण्यासाठी, राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि  शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारे पुढील कारवाई करणे आवश्यक आहे:

***

S.Bedekar/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952265) Visitor Counter : 194