वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जी 20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांची बैठक (टीआयएमएम) जयपूर येथे संपन्न


जी 20 व्यापार आणि गुंतवणूक निकाल दस्तऐवज आणि अध्यक्षपदाच्या निवेदनाला स्वीकृती

Posted On: 25 AUG 2023 2:27PM by PIB Mumbai

 

जी 20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांची बैठक आज भारताचे गुलाबी शहर म्हणून ओळख असलेल्या जयपूर येथे संपन्न झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. गोयल यांनी उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत केले आणि जागतिक व्यापार संघटना, UNCTAD, आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र आणि OECD यासह जी 20 सदस्यांचे मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ आणि प्रतिनिधी, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींची, बैठकीच्या निकालाचे दस्तऐवज आणि अध्यक्षपदाच्या निवेदनाला अंतिम रूप देण्यासाठी झालेल्या चर्चेत सहभागी होण्याची वचनबद्धता आणि योगदानाबद्दल आभार मानले. 

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक व्यवस्थेमध्ये आत्मविश्वास पुन्हा निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे,यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भर दिला आहे, असे सांगून जी 20 मंत्र्यांना संबोधित करताना, पीयूष गोयल म्हणाले की,   भविष्यातील आव्हानांचा सामना करू शकतील आणि जागतिक व्यापारात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) जास्तीतजास्त उच्च सहभाग सुनिश्चित करू शकतील अशा लवचिक आणि सर्वसमावेशक जागतिक मूल्य साखळी  तयार करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. जागतिक व्यापार संघटनेला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या, नियमांवर आधारित, खुल्या, सर्वसमावेशक, बहुपक्षीय व्यापार प्रणालीवर भारताचा दृढ विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या अध्यक्षतेखालील जी- 20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्री स्तरीय बैठकीत, जयपूर येथे झालेल्या व्यापार मंत्रिस्तरीय बैठकीच्या निकाल दस्तऐवजात स्वीकारल्या गेलेल्या पाच महत्वाच्या कृती-केंद्रित उपायांवर सहमती झाली.

एमईमईना माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी जी 20 मंत्र्यांनी जयपूर कृती आराखडा जारी केला.

मंत्र्यांनी जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राला (ITC), UNCTAD आणि जागतिक व्यापार संघटनेबरोबर सल्लामसलत करून, ITC च्या जागतिक व्यापार हेल्पडेस्कच्या अद्ययावतीकरणासाठीच्या अंमलबजावणी योजनेवर काम करण्याचे आवाहन केले, जे एमएसएमईंना भेडसावणारी माहितीची कमतरता दूर करेल. नियामक भिन्नता आणि त्याच्याशी संबंधित व्यापार खर्च कमी करण्यासाठी, व्यापारामधील अडथळे दूर करण्यासाठी, व्यापारावर लक्ष ठेवणे, गुंतवणुकीशी संबंधित उपाययोजना आणि सध्याच्या अडचणी दूर करण्यासाठी परस्पर संवादाच्या महात्वावर जी 20 मंत्र्यांमध्ये सहमती झाली.जी 20 मंत्र्यांनी 2023 मध्ये जी 20 मानक संवाद आयोजित करण्याच्या अध्यक्षपदाने केलेल्या सूचनेचे स्वागत केले, जो सदस्य, धोरणकर्ते, नियामक, मानक-निर्धारण संस्था आणि इतर भागधारकांना चांगल्या नियामक पद्धती आणि मानकांसारख्या परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आणेल.

पाचही निकाल दस्त ऐवाजांवर G20 मंत्र्यांमध्ये एकमत झाले.

आज स्वीकारण्यात आलेले निकालाचे दस्तऐवज आणि अध्यक्षपदाचे निवेदन G20 च्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे: https://www.g20.org/en/

***

S.Bedekar/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952101) Visitor Counter : 134