अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चंद्रावर भारत पोहचल्याचे स्वागत केले, पुढील दिशा आणि क्रम याबाबत दिली माहिती

प्रविष्टि तिथि: 23 AUG 2023 9:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023

चंद्रावर भारताचे स्वागत ! सलाम ISRO!".  केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांचे हे सुरुवातीचे वाक्य होते; आज संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील  पृष्ठभागावर चांद्रयान 3 चे यशस्वी सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर लगेचच अंतराळ राज्यमंत्री  डॉ जितेंद्र सिंह यांनी चांद्रयान-3 च्या लँडिंगच्या अचूक क्षणाशी जुळणारे ट्विट केले.  डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, इतरांनी केवळ चंद्राची कल्पना केली, मात्र आम्ही प्रत्यक्ष चंद्र अनुभवला. .

इतर लोक स्वप्नरंजनात गढले असताना, चांद्रयान 3 ने स्वप्न साकार केले आहे. तिरंगा चंद्राच्या अवकाशात  डौलाने फडकत आहे आणि भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार करत आहे , 'स्काय इज नॉट द लिमिट' असे  पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका संक्षिप्त निवेदनात डॉ जितेंद्र सिंह यांनी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ, मोहिमेचे संचालक मोहन कुमार आणि इस्रोच्या संपूर्ण टीमचे चंद्रावर दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सर्वप्रथम सॉफ्ट लँडिंगचा मान भारताला मिळवून दिल्याबद्दल कौतुक केले. आतापर्यंत अन्य  कोणत्याही अंतराळ मोहिमेला हे यश मिळाले नाही.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि बारीकसारीक तपशील सुनिश्चित करण्यासाठी कित्येक महिने आणि वर्षे रात्रंदिवस काम करताना किती सातत्यपूर्ण मेहनत, कठोर परिश्रम, बांधिलकी आणि तळमळ असते  हे समजून घेणे  सामान्य नागरिकांसाठी कठीण गोष्ट आहे असे ते म्हणाले.

आजच्या यशस्वी कामगिरी नंतर डॉ जितेंद्र सिंह  म्हणाले, अंतराळ क्षेत्रात जगातील आघाडीचे राष्ट्र म्हणून भारताने आपले स्थान आणखी भक्कम केले आहे. भारताचे अंतराळ क्षेत्र "खुले " करून भारताच्या अंतराळ शास्त्रज्ञांना त्यांचे संस्थापक जनक विक्रम साराभाई यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सक्षम बनवण्याचे  आणि भारताच्या प्रचंड क्षमता आणि प्रतिभा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि जगासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचे संपूर्ण  श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले .

आता यापुढील प्रवासाचा क्रम सांगताना, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, चांद्र दिन पुढील 14 दिवस राहील,  तोपर्यंत विक्रम आणि प्रग्यान वरील प्रयोग चालतील आणि सर्व उपकरणांमधून जास्तीत जास्त माहिती  संकलित केली  जाईल.

 

S.Kakade/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1951561) आगंतुक पटल : 276
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Tamil , Telugu