रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीया यांनी विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील खतांची उपलब्धता आणि वापराचा घेतला आढावा
देशात 150 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त खतांचा साठा उपलब्ध असून तो देशभरातील शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा-मांडवीय यांचे प्रतिपादन
वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी खतांचा संतुलित वापर आवश्यक असून रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा आमचा संकल्प : डॉ.मांडविया
Posted On:
22 AUG 2023 6:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2023
केंद्रीय रसायन आणि खते, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीया यांनी आज नवी दिल्ली येथे विविध राज्यांच्या कृषीमंत्र्यांशी संवाद साधत खतांची उपलब्धता आणि वापराबाबत एक बैठक घेतली. बैठकीदरम्यान त्यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि पर्यायी खतांना चालना देण्याच्या प्रगतीचा आणि या संदर्भात राज्यांनी उचललेल्या पावलांचाही आढावा घेतला.

देशात सध्या 150 लाख मेट्रिक टन साठा असल्याचे सांगून खतांची पुरेशी उपलब्धता आहे,अशी माहिती डॉ.मांडविया यांनी बैठकीच्या सुरुवातीला सर्व राज्यांना दिली आणि हा साठा केवळ चालू खरीप हंगामाची काळजी घेईल असे नाही तर आगामी रब्बी हंगामाची पुरेश्या साठ्यासह सुरुवात सुनिश्चित करेल, असे नमूद केले.

डॉ. मांडविया यांनी वसुंधरेच्या रक्षणासाठी रासायनिक खतांचा अतिरेकी वापर कमी करण्याची गरज अधोरेखित केली. केंद्र सरकारने पीएम प्रणाम योजनेच्या रूपात आधीच एक पाऊल उचलले आहे,यांचा त्यांनी पुनरुच्चार केला. भूमातेच्या संरक्षणासाठी, संथपणे मिसळत जाणारे -रिलीज सल्फर कोटेड युरिया (युरिया गोल्ड), नॅनो युरिया, नॅनो डीएपी अशा पर्यायी खतांच्या वापराला प्रोत्साहन देणे अशा प्रयत्नांचाही यामध्ये समावेश आहे. या संकल्पात सक्रिय सहभागी होण्याची तयारी सर्व राज्यांच्या सरकारांनी यावेळी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करणाऱ्या वन-स्टॉप-शॉप म्हणून काम करणाऱ्या देशभरातील प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांच्या उपक्रमावर यावेळी चर्चा झाली. त्यांनी सर्व राज्यांचे कृषी मंत्री आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना या प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांना नियमित भेट देऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले.

पर्यायी खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, रासायनिक खतांचा अतिवापर कमी करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यासाठी केंद्र आणि राज्यांत सहमती होऊन बैठक संपली. पीएम-प्रणाम, यूरिया गोल्ड, नॅनो-युरिया, नॅनो-डीएपी यांसारख्या अलीकडेच सुरू केलेल्या उपक्रमांना सर्व राज्यांतील शेतकरी समुदायाच्या मोठ्या हितासाठी अपेक्षित परिणाम साध्य करण्याच्या समान संकल्पावर एकमत व्यक्त करत मान्यता देण्यात आली आहे.
विविध राज्यांचे कृषीमंत्री आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि खते विभाग आणि कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1951143)
Visitor Counter : 144