ग्रामीण विकास मंत्रालय
पश्चिम बंगाल, पंजाब, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, बिहार आणि राजस्थान या राज्यांमधील काही जिल्ह्यांना अद्याप प्रति जिल्हा 75 अमृत सरोवरांचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही
66,278 अमृत सरोवरे बांधली/पुनरूज्जीवीत करण्यात आली
Posted On:
19 AUG 2023 3:23PM by PIB Mumbai
प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांच्या निर्मितीचे जिल्हास्तरीय उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यांनी प्रयत्न केले असून पश्चिम बंगाल, पंजाब, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, बिहार आणि राजस्थान या राज्यांमधील काही जिल्ह्यांना अद्याप प्रति जिल्हा 75 अमृत सरोवरांचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही.
आतापर्यंत निश्चित केलेल्या 1,12,277 अमृत सरोवरांपैकी 81,425 अमृत सरोवरांचे काम सुरू करण्यात आले आहे. एकूण 66,278 अमृत सरोवरांचे बांधकाम करण्यात आले आहे किंवा ती पुनरूज्जीवीत करण्यात आली आहेत.
पार्श्वभूमी:
शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 जलस्त्रोतांचा विकास आणि त्यांचे पुनरूज्जीवन करण्याच्या उद्दीष्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2022 रोजी अमृत सरोवर अभियानाचा प्रारंभ केला. या अभियानाच्या योग्य मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 50,000 अमृत सरोवरांच्या निर्मितीचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यात आले आहे.
हे अभियान संपूर्ण शासकीय दृष्टिकोनातून हाती घेण्यात आले असून यामध्ये पुढील आठ केंद्रीय मंत्रालये / विभागांचा समावेश आहे. ग्रामीण विकास विभाग, भूसंपदा विभाग, पेयजल आणि स्वच्छता विभाग, जलसंपदा विभाग, पंचायती राज मंत्रालय, वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यामध्ये सहभागी आहेत. तसेच भास्कराचार्य राष्ट्रीय अंतराळ अनुप्रयोग आणि भू-सूचना विज्ञान संस्था (BISAG-N) या मोहिमेतील तांत्रिक भागीदार आहेत. हे अभियान राज्य आणि जिल्ह्यांच्या माध्यमातून राज्यांच्या स्वतःच्या योजनांव्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंधराव्या वित्त आयोगाकडून अनुदान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक, हर खेत को पानी यांसारख्या योजनांवर पुन्हा लक्ष केंद्रित करून कार्य करते. याशिवाय या अभियानाच्या माध्यमातून नागरिक आणि अशासकीय घटक एकत्र येऊन या प्रयत्नांना गती देण्यासाठी चालना दिली जात आहे.
***
M.Pange/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1950415)
Visitor Counter : 182