सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

दिव्यांग सक्षमीकरण विभागात (डीईपीडब्ल्यूडी) प्रतिज्ञा घेऊन सद्भावना दिवस पाळण्यात आला

Posted On: 18 AUG 2023 3:17PM by PIB Mumbai

 

देशभरात 20 ऑगस्ट हा दिवस 'सद्भावना दिवस' म्हणून पाळण्यात येतो, परंतु यावर्षी हा दिवस रविवारी येत असल्याने, आज, 18 ऑगस्ट, 2023 रोजी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सद्भावना प्रतिज्ञा घेऊन हा दिवस पाळण्यात आला.

दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली या विभागातल्या अधिकाऱ्यांनी/ कर्मचाऱ्यांनी सीजिओ संकुलामधील अंत्योदय भवनच्या कॉन्फरन्स रूममध्ये आज सकाळी 11 वाजता 'सद्भावना प्रतिज्ञा' घेतली.

सर्व धर्म, भाषा आणि प्रांतामधील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक ऐक्य वाढावे यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. हिंसाचारापासून दूर राहून नागरिकांमध्ये  सद्भावना जागृत व्हावी असा हा दिवस पाळण्यामागचा हेतू आहे.

***

S.Patil/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950175) Visitor Counter : 123