संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतीय तटरक्षक दलाकडून मुंबई किनाऱ्यावर चिनी नागरिकाची वैद्यकीय उपचारासाठी सुखरुप सुटका

Posted On: 17 AUG 2023 10:07AM by PIB Mumbai

भारतीय तटरक्षक दलाने 16-17 ऑगस्ट 23 च्या मध्यरात्री मुंबईपासून अरबी समुद्रात सुमारे 200 किमी अंतरावर, पनामा ध्वजांकित संशोधन जहाज, एमव्ही डोंग फांग कान टॅन नंबर 2 मधून एका चीनी नागरिकाची वैद्यकीय कारणासाठी यशस्वीपणे सुखरूप सुटका केली. हे बचावकार्य करताना तटरक्षक दलासमोर खराब  हवामान आणि गडद अंधाराचे आव्हान होते.

संशोधन जहाजावरील क्रू सदस्यांपैकी यिन वेईगयांग नावाच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असून त्याला तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे, अशी माहिती मुंबईतील सागरी बचाव समन्वय केंद्राला मिळाली. त्यानंतर तातडीने चीन ते संयुक्त अरब अमिरात अशा प्रवासासाठी निघालेल्या या जहाजावरील सदस्यांशी संपर्क साधण्यात आला आणि  टेलिमेडिसिन माध्यमाद्वारे वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

रुग्णाला जहाजावरुन त्वरीत बाहेर काढण्यासाठी आणि त्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांसाठी सर्वोत्तम आणि व्यवहार्य पर्यायांचा विचार करून, रुग्णाला तटरक्षक दलाच्या CG ALH MK-III ने हवाई मार्गे नेण्यात आले. त्यानंतर रुग्णाला प्राथमिक उपचार देण्यात आले.

गडद अंधार असताना CG ALH आणि CGAS दमणने हाती घेतलेल्या जलद ऑपरेशनमुळे समुद्रात एका परदेशी नागरिकाचा मौल्यवान जीव वाचवता आला आणि भारतीय तटरक्षक दलाच्या “आम्ही संरक्षण करतो” या ब्रीदवाक्याची प्रचिती करुन दिली.

***

S.Thakur/B.Sontakke/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1949763) Visitor Counter : 123