उपराष्ट्रपती कार्यालय
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेला राष्ट्राला संदेश
“भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या या महत्वपूर्ण प्रसंगी मी आपल्या देशातील जनतेचे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो"
Posted On:
14 AUG 2023 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2023
या अमृत काळाच्या प्रारंभी, आपण गेल्या सत्त्याहत्तर वर्षांमधील प्रगती आणि कामगिरीबद्दल आनंद साजरा करत असताना, भारताला स्वतंत्र करण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांचे आपण स्मरण करूया. त्यांचे अद्वितीय साहस आपल्याला स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे कृतज्ञतेने जपणूक करण्याची प्रेरणा देते.
आज आपण आधुनिक भारताच्या दूरदर्शी शिल्पकारांना आदरांजली वाहूया, ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे एका मजबूत, वैविध्यपूर्ण आणि लवचिक राष्ट्राच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला.
या ऐतिहासिक दिनी, एकता, न्याय, समानता आणि बंधुत्व या संविधानातील चार मूलभूत नीतिमूल्यांविषयी असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा दृढ करूया. पुढे मार्गक्रमण करत असताना, ‘भारत’ या समृद्ध सभ्यतावादी गुणविशेषांना मूर्त रूप देणारा, एक दृढनिश्चयी प्रगतिशील आणि समृद्ध भारत निर्माण करूया.
* * *
S.Bedekar/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1948595)
Visitor Counter : 135