अंतराळ विभाग
भारतीय अंतराळ धोरण-2023 मुळे खाजगी उद्योगांना अंतराळ क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेमधील संपूर्ण मूल्य साखळीमध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी हे क्षेत्र खुले झाले आहे- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
10 AUG 2023 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2023
भारतीय अंतराळ धोरण-2023 ला मंजुरी देण्यात आली आहे आणि हे धोरण सार्वजनिक स्तरावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या धोरणाने खाजगी उद्योगांना अंतराळ क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेमधील संपूर्ण मूल्य साखळीमध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी हे क्षेत्र खुले केले आहे तर इन-स्पेस, इस्रो, एनएसआयएल यांसारख्या हितधारकांच्या भूमिकांची निश्चित आखणी केली आहे.
राज्यसभेमध्ये एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, “ सरकारने इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायजेशन सेंटर( इन-स्पेस) या संस्थेची अंतराळ क्षेत्राशी संबंधित व्यवहारांना प्रोत्साहन आणि अधिकृतता देण्यासाठी एक खिडकी संस्था म्हणून स्थापना केली होती.
अणुऊर्जा विभागाच्या देखरेखीखाली लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्जर्वेटर- इंडिया(लिगो-इंडिया) या अंदाजे 2600 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहितीही डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर गुरुत्वाकर्षणीय लहरींचा शोध घेण्यासाठी आणि खगोलशास्त्राशी संबंधित संशोधनासाठी एक राष्ट्रीय संस्था म्हणून लिगो –इंडिया काम करेल. चांद्रयान-3 संदर्भात माहिती देताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी या यानाचे प्रक्षेपण यशस्वी झाल्याची माहिती दिली.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1947612)
आगंतुक पटल : 196