आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायन आणि खते मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांचे ‘इंडिया मेडटेक एक्स्पो 2023’ च्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन, केंद्रीय रसायने आणि खते राज्य मंत्री भगवंत खुबा यांची उपस्थिती


गुजरातमध्ये गांधीनगर येथे 17-19 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित होणाऱ्या जी-20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीच्या सोबत इंडिया मेडटेक एक्स्पो 2023 चे आयोजन करण्यात येणार

Posted On: 10 AUG 2023 4:47PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2023

2050 पर्यंत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या बाजारपेठेचे मूल्य 50 अब्ज डॉलरपर्यंत होण्याचा अंदाज असल्याने भारत या क्षेत्रातील जागतिक केंद्र बनण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खत मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले आहे. ‘इंडिया मेडटेक एक्स्पो 2023’ या भारतात पहिल्यांदाच वैद्यकीय तंत्रज्ञानावर आयोजित होणाऱ्या प्रदर्शनाची विशेष माहिती देण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. गुजरातमध्ये गांधीनगर येथे 17-19 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित होणाऱ्या जी-20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीच्या सोबत इंडिया मेडटेक एक्स्पो 2023 चे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा हे देखील उपस्थित होते. 

वैद्यकीय उपकरणांचे क्षेत्र हे भारतात झपाट्याने प्रगती करणाऱ्या ‘सनराईझ’ क्षेत्रांपैकी एक मानले जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारताला वैद्यकीय उपकरण निर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलत आहे, असे मांडविया यांनी सांगितले. बाजारपेठेमध्ये सध्याच्या 1.5 टक्के वाट्यासह पुढील पंचवीस  वर्षात या बाजारपेठेतील भारताचा वाटा 10-12 टक्क्यांपर्यंत वाढण्याची आम्हाला आशा आहे, असे ते म्हणाले. अलीकडेच लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय उपकरणे धोरण 2023 च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्राचे मूल्य सध्याच्या 11 अब्ज डॉलरवरून 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलर होण्याचा आम्हाला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.

काही दिवसांनी आयोजित होणाऱ्या मेडटेक एक्स्पो 2023 मध्ये वैद्यकीय आणि शल्यक्रियाविषयक प्रक्रिया, औषधे, उपकरणे आणि सुविधा यामधील भारताचे नवोन्मेष आणि उल्लेखनीय कामगिरीचे दर्शन घडवण्यात येईल. या प्रदर्शनामुळे भारतातील वैद्यकीय उपकरण परिसंस्थेचे दर्शन घडेल आणि भारतीय वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योगांच्या ब्रँडची ओळख निर्माण होईल.

भगवंत खुबा म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार देशाला आरोग्य क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. उद्योग आणि प्रसारमाध्यम कर्मचारी यांच्यासह सर्व हितधारकांना त्यांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आणि या क्षेत्रात झालेल्या परिवर्तनकारी कामाचा अनुभव घेण्याचे आवाहन केले.  

फार्मास्युटिकल्स विभागाच्या सचिव एस. अपर्णा यांनी सांगितले की वैद्यकीय उपकरणांचे क्षेत्र सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे.

पार्श्वभूमी:

या क्षेत्रामध्ये असलेल्या खूप मोठ्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी आणि पुढील वाटचालीची दिशा निश्चित करण्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी केंद्र सरकारच्या रसायने आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाने ‘इंडिया मेडटेक एक्स्पो’चे आयोजन केले आहे. भारतः भविष्यातील मेडटेक जागतिक केंद्र, उपकरणे, निदान आणि डिजिटल यांचे भवितव्य ही या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

या प्रदर्शनात फ्युचर पॅव्हिलियन, आर अँड डी पॅव्हिलियन, स्टार्ट-अप पॅव्हिलियन,स्टेट पॅव्हिलियन, रेग्युलेटर्स पॅव्हिलियन यांच्यासह विविध पॅव्हिलियन आणि मेक इन इंडिया शोकेस असेल. 150 हून जास्त एमएसएमई, 150 हून जास्त देशी आणि आंतरराष्ट्रीय उत्पादक, स्टार्ट-अप्स, नियामक संस्था, राज्य सरकारे आणि केंद्रीय विभाग यांचे 400 पेक्षा जास्त प्रदर्शन आयोजक यामध्ये सहभागी होतील. मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि गुजरात ही सात राज्ये या प्रदर्शनात आपापले पॅव्हिलियन उभारणार आहेत. स्टार्टअप्ससाठी एक स्वतंत्र पॅव्हिलियन असेल आणि सुमारे 75 स्टार्टअप्स त्यामध्ये सहभागी होत आहेत.   

 

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1947476) Visitor Counter : 168