कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही - केंद्र सरकार


चालू वर्षासह मागील तीन वर्षात (2020-2023) नियम 56(जे ) अंतर्गत 122 अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची माहिती

Posted On: 09 AUG 2023 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2023

 

केंद्र सरकारी  कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही असे केंद्र  सरकारने आज स्पष्ट केले.

चालू वर्षासह मागील तीन वर्षांत (2020-2023) नियम 56(जे ) अंतर्गत 122 अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली आहे.केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन , अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना  ही माहिती दिली.

डॉ जितेंद्र सिंह यांनी विविध मंत्रालये/विभाग/संवर्ग नियंत्रण प्राधिकरण  (सीसीए ), यांनी  प्रदान केलेल्या प्रोबिटी पोर्टलवर (30.06.2023 पर्यंत) उपलब्ध अद्ययावत माहिती/डेटा नुसार मूलभूत नियम (एफआर )-56(जे / तत्सम तरतुदी अधिकार्‍यांच्या विरोधात लागू करण्यात आल्यासंदर्भात तपशील दिला.

एफआर  56(जे )/ तत्सम तरतुदी अंतर्गत आढावा  प्रक्रियेचा उद्देश कार्यक्षमता आणणे आणि प्रशासकीय यंत्रणा मजबूत करणे हा आहे.डिजिटायझेशन, ई-कार्यालयाचा वाढीव वापर, नियमांचे सुलभीकरण, कालानुरूप संवर्ग  पुनर्रचना आणि प्रशासन बळकट करण्यासाठी अनावश्यक कायदे रद्द करण्यासाठी आणि प्रशासनातील एकूण कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे, असे मंत्री म्हणाले.

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1947229) Visitor Counter : 157