संरक्षण मंत्रालय

भारतीय जहाजांची दुबईच्या राशीद बंदराला भेट (08 – 11 ऑगस्ट 23)

Posted On: 09 AUG 2023 11:42AM by PIB Mumbai

भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम आणि आयएनएस त्रिकंद, 08 ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान दुबईच्या राशीद बंदराच्या दौऱ्यावर  आहेत. नौदलाच्या पश्चिम ताफ्याचे प्रमुख, ध्वज अधिकारी रिअर अॅडमिरल विनीत मॅकार्टी यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा होत आहे.  आयएनएस विशाखापट्टणमची धुरा कॅप्टन अशोक राव तर आयएनएस त्रिकंदची धुरा कॅप्टन प्रमोद जी थॉमस सांभाळत आहेत.

या भेटीदरम्यान, दोन्ही देशांचे नौदल दल सागरी कार्यान्वयना संबंधित विविध घटकांवर व्यावसायिक संवाद साधतील. दोन्ही नौदलांमधील सहकार्य वाढवणे आणि संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने सर्वोत्तम पद्धतीही सामायिक करतील. युएई नौदलासोबत 'झायेद तलवार' हा द्विपक्षीय युद्धाभ्यास देखील नियोजित आहे. यामुळे दोन्ही नौदलांमधील परस्पर कार्यक्षमता आणि समन्वय वाढेल. या भेटीमुळे उभय नौदलांमधील सागरी भागीदारी आणखी वाढेल आणि या प्रदेशातील सुरक्षा आव्हानांची परस्पर समजही वाढेल.

****

Jaydevi PS/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1946998) Visitor Counter : 125