दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

प्रसारण आणि केबल सेवांच्या नियामक चौकटीचा आढावा घेण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने(ट्राय) प्रसिद्ध केली सल्लामसलत पत्रिका

Posted On: 08 AUG 2023 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023

प्रसारण आणि केबल सेवांच्या नियामक चौकटीचा आढावा घेण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने(ट्राय) आज सल्लामसलत पत्रिका जारी केली. 2020च्या सुधारित चौकटीच्या अंमलबजावणीशी संबंधित विविध मुद्यांवर विचारविनिमय करण्यासाठी आणि पुढील मार्ग सुचवण्यासाठी इंडियन ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल फाऊंडेशन (IBDF), ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन (AIDCF) आणि डीटीएच असोसिएशन यांचे सदस्य असलेल्या एका समितीची ट्रायच्या छत्राअंतर्गत स्थापना करण्यात आली होती.

या समितीने 2020च्या सुधारित चौकटी संदर्भातील विविध मुद्दे मांडले. मात्र, हितधारकांनी 2020 च्या सुधारित चौकटीची सुलभतेने अंमलबजावणी करण्यात अडथळे निर्माण करू शकणाऱ्या महत्त्वाच्या मुद्यांचे ट्रायने वेळेवर निरसन करावे अशी विनंती केली.

आवश्यक त्या विचारविनिमय प्रक्रियेनंतर ट्रायने 22 नोव्हेबर 2022 रोजी दळणवळण( प्रसारणकर्ते आणि केबल) सेवा(आठव्या), शुल्क(तिसरी सुधारणा) आदेश, 2022 आणि दूरसंचार(प्रसारण आणि केबल) सेवा इंटरकनेक्शन(ऍड्रेसेबल सिस्टिम)(चौथी सुधारणा) नियामक 2022 ची अधिसूचना जारी केली ज्यामध्ये खालील मुद्दे समाविष्ट करण्यात आले :

  1. टीव्ही वाहिन्यांच्या एमआरपीवरील सवलत पुढे सुरू राहील
  2. बुकेमध्ये समाविष्ट करण्यासाठी टीव्ही वाहिन्यांच्या एमआरपीवर रु.19/- कमाल मर्यादा 
  3. बुके तयार करताना किमतीच्या बेरजेवर  45% सवलत
  4. बुकेवर प्रसारकाकडून 15% अतिरिक्त प्रोत्साहनलाभ देण्यास अनुमती देणार

शुल्क, आंतरजोडणी आणि प्रसारण आणि केबल सेवांच्या सेवांची गुणवत्ता यांच्याशी संबंधित हितधारकांच्या समितीने मांडलेल्या आणि इतर हितधारकांनी सुचवलेल्या उर्वरित मुद्यांचे निरसन करण्याकरिता प्राधिकरणाने हितधारकांकडून सूचना मागवण्यासाठी ही सल्लामसलत पत्रिका जारी केली आहे. 5 सप्टेंबर 2023 पर्यंत त्यावरील लेखी सूचना आमंत्रित करण्यात येत आहेत. त्यावरील प्रतिसूचना 19 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करता येतील. सूचना आणि प्रतिसूचना प्राधान्याने इलेक्ट्रॉनिक स्वरुपात advbcs-2@trai.gov.in  आणि jtadvbcs-1@trai.gov.in या ईमेल पत्त्यावर पाठवाव्यात.

 

 

 

 

S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1946681) Visitor Counter : 124