माहिती आणि प्रसारण मंत्रालय

जीसॅट-24 यशस्वीरित्या कार्यान्वित होणे हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल- माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र


मागणी आधारित मोहीमांच्या क्षेत्रात भारताच्या यशस्वी प्रवेशाचा जीसॅट-24 द्वारे डंका- इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ

अंतराळ क्षेत्रातील सुधारणांनंतर जीसॅट-24 ही एनएसआयएल ची सर्वात पहिली मागणी आधारित दळणवळण उपग्रह मोहीम

Posted On: 07 AUG 2023 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्ट 2023

 

न्यूस्पेस इंडिया लिमिटेड(NSIL) या कंपनीने टाटा प्ले या कंपनीसोबत भागीदारी करत  जून 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या दृष्टीकोनाला अनुसरून जीसॅट-24चे प्रक्षेपण केले. आजपासून सुरू होत असलेल्या आपल्या कक्षीय स्थितीत असलेल्या या उपग्रहाचा वापर आज टाटा प्ले ने सुरू केला.

टाटा प्लेच्या नवी दिल्ली येथील प्रसारण केंद्रामध्ये याच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांनी आनंद व्यक्त केला आणि जीसॅट-24 च्या यशस्वी कार्याबद्दल अंतराळ विभाग आणि टाटा प्ले चे अभिनंदन केले. या कार्यक्रमामुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणि अंतराळ आणि दळणवळण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेकडे आणखी एक पाऊल पडले आहे, असे त्यांनी सांगितले.  

“सध्या टाटा प्लेकडे 600 वाहिन्या असून इस्रोच्या उपग्रहाच्या समावेशामुळे आता ते 900 वाहिन्यांचे प्रसारण करू शकणार आहेत ज्याचा सामान्य नागरिकांना फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनएसआयएल ची स्थापना आणि खाजगीकरणाच्या दृष्टीकोनाची ही पूर्तता आहे, ज्यामध्ये  टाटा प्लेसोबत भागीदारी करून पहिल्यांदाच मागणी आधारित उपग्रहाचे प्रक्षेपण केले. या वाहिन्या आता ईशान्येकडील डोंगराळ भाग आणि अंदमान आणि निकोबार बेटे यांच्यासह देशभरात सर्वत्र उपलब्ध होणार आहेत.

डीटीएच सेवा पुरवण्यासाठी इस्रोने बनवलेला जीसॅट-24 हा चार टन श्रेणीमधला दळणवळण उपग्रह कक्षीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर  आपल्या कमाल उपग्रह क्षमतेने कार्यान्वित झाला आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे(ISRO) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली. अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या भारतीय दळणवळण क्षेत्रात या ऐतिहासिक कामगिरीने क्रांती झाली आहे.

एनएसआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन् दुराईराज म्हणाले, “जीसॅट-24 ही अंतराळ क्षेत्रातील सुधारणांनंतर एनएसआयएलने हाती घेतलेली  सर्वात पहिली मागणी आधारित दळणवळण उपग्रह मोहीम आहे. भारतात सॅटेलाईट टेलिव्हिजनच्या नव्या युगात प्रवेश करण्यासाठी जीसॅट-24  सज्ज आहे. मेक इन इंडिया उपक्रमाच्या यशाचा दाखला म्हणून हा उपग्रह अत्याधुनिक डिजिटल टीव्ही प्रसारण क्षमतांसह स्थानिक प्रसारण सेवांना पाठबळ देईल.”

या ऐतिहासिक क्षणावर भाष्य करताना टाटा प्ले चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हरीत नागपाल म्हणाले, “प्रेक्षकांना उत्तम दर्जाच्या प्रसारणाचा अनुभव देण्याला टाटा प्लेचे मुख्य प्राधान्य आहे.

जीसॅट-24 हा 24-Ku बँड दळणवळण उपग्रह भारत सरकारने केवळ टाटा प्लेच्या डीटीएच ऍप्लिकेशनच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रक्षेपित केला आहे.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1946558) Visitor Counter : 151