पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या मुत्सद्दी संबंधांना 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांची घेतली नोंद
ब्रिक्स शिखरपरिषदेच्या तयारीविषयी राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी पंतप्रधानांना दिली माहिती
ब्रिक्स शिखरपरिषदेतील सहभागासाठी जोहान्सबर्ग भेटीविषयी पंतप्रधानांनी व्यक्त केली उत्सुकता
भारताच्या जी-20 अध्यक्षतेला राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी दर्शविला संपूर्ण पाठिंबा
प्रविष्टि तिथि:
03 AUG 2023 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण आफ्रिकी प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष माटामला सिरिल रामाफोसा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीचे सकारात्मक दृष्टिकोनातून मूल्यमापन केले. 2023 मध्ये द्विपक्षीय मुत्सद्दी संबंधांच्या प्रारंभाला तीस वर्षे पूर्ण होत असल्याचाही यात समावेश होता.
22-24 ऑगस्ट 2023 दरम्यान दक्षिण आफ्रिकेत भरवण्यात येत असलेल्या ब्रिक्स शिखरपरिषदेत सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी पंतप्रधानांना निमंत्रण दिले. सदर परिषदेच्या तयारीची माहितीही त्यांनी पंतप्रधानांना दिली. पंतप्रधानांनी निमंत्रण स्वीकारत, या परिषदेत भाग घेण्यासाठी जोहान्सबर्ग येथे भेट देण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.
परस्पर स्वारस्याच्या अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही त्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.
भारताच्या विद्यमान जी-ट्वेंटी अध्यक्षतेअंतर्गत भारत हाती घेत असलेल्या उपक्रमांना राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. तसेच जी-20 शिखर परिषदेसाठी भारतभेटीवर येण्याविषयी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले.
परस्पर संपर्कात राहण्याचे उभय नेत्यांनी मान्य केले.
S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1945624)
आगंतुक पटल : 236
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
English
,
Urdu
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam