पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याबाबतचे संयुक्त निवेदन
Posted On:
14 JUL 2023 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2023
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष माननीय इम्यॅनुएल मॅक्रॉन यांचे निमंत्रण आणि भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीचे 25 वे वर्ष यांचे औचित्य साधत फ्रान्स गणराज्याच्या राष्ट्रीय दिवसाचे प्रमुख पाहुणे अशा सन्मानासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला फ्रान्सचा ऐतिहासिक दौरा पूर्ण केला. परिवर्तन आणि अनिश्चिततेच्या जागतिक वातावरणात जानेवारी 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक यांनी उभय देशातील संबंधाला धोरणात्मक भागीदीरीचे कोंदण दिले. भारताची ही कोणत्याही देशाबरोबरची पहिलीच धोरणात्मक भागीदारी होती.
ही निर्णायक वचनबद्धता म्हणजे 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून पाच दशकांच्या मजबूत आणि स्थिर भागीदारीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या दृढ परस्पर विश्वासाची पुष्टीच होती.
उभय देशांमधील संबंध, प्रतिकूल परिस्थितीतही तसेच संधीच्या महत्वाकांक्षी लांटावरही खंबीरपणे टिकून आहेत. सामायिक मूल्ये, सार्वभौमत्व आणि धोरणात्मक स्वायत्ततेवरील विश्वास, आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदशी अतूट वचनबद्धता, बहुपक्षीयतेवर विश्वास तसेच शाश्वत बहुध्रुवीय जगासाठी हे एक समान शोधाच्या रुपात पाहिले जाऊ शकते असे या दोन्ही नेत्यांनी भेटीनंतर मान्य केले.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी गेल्या 25 वर्षांमधील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रत्येक क्षेत्रातील संबंधांच्या परिवर्तनाचा आणि विस्ताराचा आढावा घेतला. प्रादेशिक जबाबदाऱ्या आणि जागतिक महत्त्वाच्या भागीदारीत झालेला विकासही त्यांनी अधोरेखित केला.
आपले राजकीय आणि राजनैतिक संबंध आपल्याकरता निकटतम आणि सर्वात विश्वासार्ह आहेत. आपली संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी मजबूत आहे आणि ती समुद्राच्या तळापासून अंतराळापर्यंत पसरलेली आहे. आपले आर्थिक संबंध, आपल्या समृद्धी आणि सार्वभौमत्वाला बळ देते तसेच लवचिक पुरवठा साखळीला चालना देते. स्वच्छ ऊर्जा आणि कमी-कार्बन उत्सर्जन यास चालना देणे, जैवविविधतेचे रक्षण करणे, महासागरांचे रक्षण करणे आणि प्रदूषणाशी लढा देणे हे सहकार्याचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. तसेच डिजिटल, नवोन्मेष आणि स्टार्टअप भागीदारी हे दृढ समन्वयावर आधारित विकासाचे एक नवीन क्षेत्र असून आपल्या दोन्ही देशांसाठी पूरक असल्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले.
शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संस्कृती, आपल्या तरुणाईची देवाणघेवाण आणि उभय देशातील समुदायांचे दृढ होत असलेले संबंध लोकांना जवळ आणत आहेत आणि भविष्यातील भागीदारीची बीजे पेरत आहेत.
आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे, विखुरत्या जगात एकता वाढवणे, बहुपक्षीय प्रणाली सुधारणे आणि ती पुनरुज्जीवित करणे, सुरक्षित आणि शांततापूर्ण हिंद-प्रशांत प्रदेश तयार करणे, हवामान बदल, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, अन्न सुरक्षा, गरिबी आणि विकास यासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देणे हा सध्याच्या संकटे आणि आव्हानकाळातील या भागीदारीचा अर्थ आहे.
आपण 2047 च्या दिशेने अग्रेसर होणाऱ्या आगामी 25 वर्षांची वाटचाल एकत्रितपणे साहसिक दृष्टिकोण आणि विकासात्मक महत्वाकांक्षेने करण्यासाठी पुढे सरसावत आहोत. आपण आज भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी, आपल्या राजनैतिक संबंधांची शताब्दी आणि धोरणात्मक भागीदारीचे अर्धशतक साजरे करण्यासाठी उत्सुक आहोत.
पुढील 25 वर्षे आपल्या दोन्ही देशांसाठी, आपल्या भागीदारीसाठी - आपल्या लोकांसाठी आणि या वसुंधरेवर आपल्या सोबत राहाणाऱ्यां प्रत्येकाकरीता चांगले भविष्य घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या या पुढील टप्प्यासाठीचे सामायिक दृष्टीकोन निश्चित करण्यासाठी, दोन्ही नेत्यांनी "भारत-फ्रेंच धोरणात्मक भागीदारीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त फ्रेंच-भारतीय संबंधांच्या शतकाच्या दिशेने; क्षितिज 2047 पथदर्शी आराखडा" स्वीकारला. क्षितिज 2047 पथदर्शी आराखडा आणि परिणामांची यादी येथे पाहता येऊ शकते.
N.Joshi/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1945382)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada