महिला आणि बालविकास मंत्रालय

महिला सक्षमीकरण या विषयावरील जी 20 मंत्रीस्तरीय परिषदेचे येत्या 2 ते 4 ऑगस्ट 2023 दरम्यान गुजरात मध्ये गांधीनगर येथे आयोजन

Posted On: 01 AUG 2023 10:37AM by PIB Mumbai

संकल्पना : 'आंतर-पिढी परिवर्तनाच्या उंबरठ्यावर महिलांच्या नेतृत्वाखालील सर्वसमावेशक विकास'

या परिषदेत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर अधिक भर देण्यात येणार असून लिंग समानता, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे - लक्ष्य 5 साध्य करण्यासाठी गती वाढवण्याची संधी प्रदान केली जाईल.

भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेखाली महिला सक्षमीकरण या विषयावरील जी 20 मंत्रीस्तरीय परिषदेचे केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती झुबीन इराणी यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 2 ते 4 ऑगस्ट 2023 दरम्यान गुजरात मध्ये गांधीनगर येथे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर अधिक भर देण्यात येणार असून लिंग समानता, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे - लक्ष्य 5 साध्य करण्यासाठी गती वाढवण्याची संधी प्रदान केली जाईल.

तीन दिवस चालणाऱ्या या मंत्रीस्तरीय बैठकीत जी 20 सदस्य, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था (IOs) यांच्या संबंधित शिष्टमंडळांच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली 150 हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग असेल.

मंत्रिस्तरीय परिषदेच्या प्रारंभी पंतप्रधान, नरेंद्र मोदी विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करतील.

या तीन दिवसांत होणाऱ्या संवाद आणि चर्चासत्रांमध्ये महिला सक्षमीकरणात निर्णायक सकारात्मक बदल घडवून आणू शकणाऱ्या शिक्षणाचे महत्व, महिला उद्योजकता इक्विटी आणि अर्थव्यवस्थेसाठी एक विजयी स्थिती या प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल. या सत्रांमधील संकल्पनाधिष्ठित चर्चा आणि विचारमंथन अध्यक्षांच्या सारांशात प्रतिबिंबित होतील आणि जी 20 नेत्यांना शिफारसी म्हणून प्रदान केल्या जातील.

याशिवाय आशियाई विकास बँक, संयुक्त राष्ट्र महिला आणि राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य बाल विकास संस्था, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहकार्याने एकत्रितपणे एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. याद्वारे लैंगिक समानतेसाठी वित्तीय धोरणे आणि साधने, देखभाल अर्थव्यवस्था आणि हवामान बदलाचे आव्हान या तीन प्रमुख क्षेत्रांमधील कृती आणि धोरणे ओळखणे, यांना प्राधान्य देऊन लिंगभाव  समानता रुजवण्याचा कार्याला गती दिली जाईल.

2 आणि 3 ऑगस्ट, 2023 रोजी, महिला आणि बाल विकास मंत्रालय 'भारत @ 75: महिलांचे योगदान' या संकल्पनेवर एक प्रदर्शन आयोजित करणार आहे ज्यामध्ये हस्तकला, पोषण आणि अन्न, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित ( एस टी ई एम ), शिक्षण आणि कौशल्य,  व्यापार आणि अर्थव्यवस्था  या क्षेत्रातील महिलांच्या योगदानावर लक्ष केंद्रित केले जाईल.

***

Jaydevi PS/Bhakti/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1944558) Visitor Counter : 204