केंद्रीय लोकसेवा आयोग

केंद्रीय लोक सेवा आयोगाकडून 2 जुलै 2023 रोजी घेण्यात आलेल्या  सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त परीक्षेबद्दल सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांचे  खंडन


प्रत्येक स्तरावरील पात्र आणि अपात्र उमेदवारांची गुणवत्ता पदे क्रमाने आणि परीक्षार्थींच्या कामगिरीनुसार आहेत

Posted On: 28 JUL 2023 2:55PM by PIB Mumbai

 

2 जुलै 2023 रोजी आयोगाने घेतलेल्या सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त परीक्षेत पेपर फुटल्याप्रकरणी  सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत.परीक्षा पार पडल्यानंतर वेगवेगळ्या सोशल मीडिया पोर्टलवर प्रश्नपत्रिकांच्या काही भागाची छायाचित्रे अपलोड करण्यात आली आहेत.  तोपर्यंत परीक्षेला बसलेल्या सर्व परीक्षार्थींच्या हातात लाखो प्रश्नपत्रिका होत्या आणि आयोगाने संकेतस्थळावर  प्रश्नपत्रिका अपलोडही केल्या होत्या. त्यामुळे, आयोगाच्या बाजूने अशी माहिती  विश्वासार्ह किंवा कारवाई करण्यायोग्य नाही.

मात्र तरीही, आयोगाने या घटनेची नोंद घेतली आणि देशभरातील सर्व केंद्रांमधील परीक्षेच्या प्रक्रियेची आणि तपासणीची संपूर्ण छाननी केली. संशयास्पद असे काहीही आढळले  नाही. तसेच, पूर्ण सावधगिरीची बाब म्हणून, काही अनुचित घडले का हे शोधण्यासाठी गुणवत्ता यादीच्या सर्व स्तरांवर परीक्षेच्या निकालाच्या डेटाचे विश्लेषण देखील केले. प्रत्येक स्तरावर पात्र आणि अपात्र उमेदवारांचे गुणवत्ता यादीतील  क्रम व्यवस्थित आणि परीक्षार्थींच्या कामगिरीनुसार असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

काही केंद्रांमधून जास्त उमेदवार पात्र होत असल्याच्या संदर्भात, खुल्या स्पर्धांमध्ये हे काही वेगळे नाही असे नमूद केले आहे. समान अनुपात आधारावर  कोणत्याही दोन परीक्षांची तुलना केली जाऊ शकत नाही तसेच वेगवेगळ्या वर्षांतील त्याच  परीक्षेच्या निकालाची आकडेवारी देखील वेगळी असू शकते.

घटना आणि डेटाच्या तपशीलवार आणि सखोल विश्लेषणाच्या आधारे, आयोगाचे असे ठाम मत आहे की सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा निराधार  आहेत.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943700) Visitor Counter : 109