उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कारगिल विजय दिवसाच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त आज राज्यसभेत वाहण्यात आली श्रद्धांजली


उपराष्ट्रपतींनी आपल्या सैनिकांच्या अदम्य साहसाची केली प्रशंसा

या वीरांच्या शौर्याची गाथा आम्हाला सतत प्रेरणा देत आहे - उपराष्ट्रपती

Posted On: 26 JUL 2023 4:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2023

 

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी आज वरिष्ठ सभागृहात कारगिल विजय दिवसाच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या शूर सैनिकांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला आदरांजली वाहिली.

उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात, धोकादायक भूप्रदेश आणि अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीवर मात करत शेवटी शत्रूचा पराभव करून अनुकरणीय शौर्य दाखविणाऱ्या सैनिकांच्या अदम्य धैर्याची आणि शौर्याची प्रशंसा केली. “त्यांच्या शौर्याची गाथा आम्हाला कायम राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देत आहे.” असेही ते म्हणाले.

 

शहीद जवानांच्या उल्लेखनीय बलिदानाची दखल घेत उपराष्ट्रपतींनी सर्व नागरिकांनी भारताला सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी पुन्हा समर्पित होण्याचे आवाहन केले.

सशस्त्र दलाच्या जवानांना अभिवादन करताना धनखड यांनी त्यांचे कर्तव्याप्रती असलेले अखंड समर्पण आणि वचनबद्धता या गुणांचे कौतुक केले.

राज्यसभेच्या सर्व सदस्यांनी शहिदांप्रति कृतज्ञता व्यक्त करत या शूर सैनिकांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे सभागृहात मौन पाळले.

राज्यसभेतील उपराष्ट्रपतींचे संपूर्ण निवेदन खाली दिले आहे.

 

* * *

R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1942844) Visitor Counter : 111