उपराष्ट्रपती कार्यालय

कारगिल विजय दिनानिमित्त उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या सभापतीचे सभागृहातील निवेदन

Posted On: 26 JUL 2023 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2023

 

माननीय सदस्यांनो, आज कारगिल विजय दिनाचा २४ वा वर्धापन दिन आहे. 1999 मध्ये आजच्याच दिवशी आपल्या शूर जवानांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि निर्धाराने कारगिलमध्ये घुसखोरांना आपल्या हद्दीतून हाकलून लावले होते.

कारगिल युद्धात शहीद झालेल्यांप्रती आज  कृतज्ञतेने मान झुकवूया. तसेच आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास सदैव तत्पर असलेल्या आपल्या सैन्याला आणि जवानांना सलाम.

अनुकरणीय धाडस दाखवत आपल्या शूर सैनिकांनी खडतर भूभाग आणि अत्यंत प्रतिकूल हवामानावर मात केली आणि शत्रूचा पराभव केला. त्यांच्या शौर्याची गाथा आपल्याला देशसेवेसाठी दररोज प्रेरणा देत असते.

माननीय सदस्यांनो, कारगिल विजय दिन साजरा करताना आपण आपल्या शूर जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करूया. भारताला प्रथम ठेवण्यासाठी स्वत:ला पुन्हा समर्पित करण्याची ही संधी आहे.

या आदरणीय सभागृहाच्या वतीने आणि  मी स्वत: मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी सदस्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्थानी उभे  राहून  आपल्या शूर सैनिकांच्या स्मरणार्थ मौन पाळावे.

 

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1942791) Visitor Counter : 117