राष्ट्रपती कार्यालय

भारतीय वन सेवेचे परिविक्षाधीन अधिकारी आणि भारतीय संरक्षण संपदा सेवा विभागाचे अधिकारी/अधिकारी प्रशिक्षणार्थीनी आज राष्ट्रपतींची भेट घेतली

Posted On: 24 JUL 2023 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2023

 

भारतीय वन सेवेचे परिविक्षाधीन अधिकारी (2022 च्या तुकडीतले) आणि  भारतीय संरक्षण संपदा सेवा विभागाचे अधिकारी/अधिकारी प्रशिक्षणार्थीनी (2018 आणि 2022 ची तुकडी) आज (24 जुलै, 2023) राष्ट्रपती भवन इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

शासकीय अधिकारी म्हणून तुम्हा सर्वांची कारकीर्द अशावेळी सुरु होते आहे जेव्हा भारत जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याच्या भूमिकेत आहे, असे राष्ट्रपती यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या. भारत आपली सांस्कृतिक समृद्धी आणि तंत्रज्ञानातील प्रगतीच्या जोरावर संपूर्ण विश्वाच्या आकर्षणाचे केंद्रस्थान बनला आहे. परंपरा आणि तंत्रज्ञान एकमेकांना पूरक असल्याचे भारताने जगाला दाखवून दिले आहे, असे त्या म्हणाल्या.

आपण पुरवत असलेल्या सेवा आणि सुविधा पर्यावरणस्नेही आणि शाश्वत आहेत याची खातरजमा करण्याची जबाबदारी भारतीय संरक्षण संपदा सेवा विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे. तंत्रज्ञान हे सुशासनासाठी उत्तम माध्यम आहे आणि म्हणून अधिकाऱ्यांनी आपल्याक्षेत्रातील  कौशल्यासह  तांत्रिक कौशल्ये अद्ययावत करत राहणे आवश्यक आहे. लष्करी छावण्यांचे  प्रभावी प्रशासन आणि संरक्षण जमिनींचे व्यवस्थापन करण्याकरता तंत्रज्ञानाचा अधिकतम वापर केला पाहिजे असे राष्ट्रपती म्हणाल्या.

भारताचे हवामान आणि स्थलाकृतिचा  वनक्षेत्र वितरणाशी जवळचा संबंध आहे,  असे राष्ट्रपती भारतीय वन सेवेच्या  परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या. जंगले आणि  त्यांच्यावर अवलंबून असणारे  वन्यजीव हे आपल्या देशाची अमूल्य संसाधने आणि वारसा आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास, वनाच्छादनाचा ऱ्हास, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हे जागतिक स्तरावरील भागीदारीमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत, असे त्यांनी सांगितले.

त्यामुळेच पर्यावरणाचे संवर्धन हा  एकविसाव्या शतकातील चिंतेचा  एक प्रमुख विषय ठरला आहे. भारताने जगाला पर्यावरण पूरक जीवनशैली अर्थात लाईफ हा मंत्र दिला आहे. जंगले या उपाय योजनांमधील एक अविभाज्य भाग असून भारतीय वन सेवेतील अधिकारी या समस्यांवरील उपायांचे दाते आहेत. या मंत्राच्या व्यावहारिक अंमलबजावणीसाठी त्यांनी अथक प्रयत्न करणे अपेक्षित आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

Jaydevi PS/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1942095) Visitor Counter : 92