आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रमामध्ये  भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा  केला पार: ऑक्‍टोबर 2022 मध्‍ये हा  कार्यक्रम  सुरू झाल्यापासून टेली -मानस या  सेवेच्या मदत क्रमांकावर 200,000 हून अधिक दूरध्वनी प्राप्त


देशभरातील सर्वांना दर्जेदार मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध 

31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 42 हून अधिक कार्यान्वित  टेली -मानस कक्ष ,या सेवेच्या माध्यमातून  सध्या 20 भाषांमध्ये दररोज दूरध्वनीवरून 1,300+ मानसिक आरोग्य  सल्ले

प्रथम श्रेणी  सेवेच्या माध्यमातून  1900 हून अधिक प्रशिक्षित समुपदेशक कार्यरत

परीक्षांच्या  हंगामात परीक्षेच्या ताणाशी संबंधित दूरध्वनींमध्ये  वाढ दिसून आली

Posted On: 22 JUL 2023 9:11AM by PIB Mumbai

 

देशातील मानसिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ऑक्टोबर 2022 मध्ये भारत सरकारने सुरू केलेला राष्ट्रीय टेलि -मानसिक  कार्यक्रमाने (संपूर्ण देशामध्ये टेली मानसिक आरोग्य सहाय्य  आणि नेटवर्किंग :टेली मानस, 'जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम' ची डिजिटल शाखा) एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून या टोल-फ्री सेवेच्या माध्यमातून  देशाच्या विविध भागांतून 2,00,000 हून अधिक दूरध्वनी  प्राप्त झाले आहेत, हे   सातत्याने या सेवेचा लाभ अधिकाधिक घेतला जात असल्याचा कल दर्शवते. 1 लाख दूरध्वनी कॉल्स (एप्रिल 2023 मध्ये) ते 2 लाख दूरध्वनी कॉल्सपर्यंत   केवळ 3 महिन्यांच्या अंतराने प्राप्त झालेल्या या दूरध्वनी  कॉल्सच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केलेल्या ट्विटमध्ये या कामगिरीबद्दल  देशवासियांचे अभिनंदन केले आहे.

31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 42 हून अधिक कार्यान्वित  टेली -मानस कक्षया सेवेच्या माध्यमातून  सध्या 20 भाषांमध्ये दररोज दूरध्वनीवरून 1,300+ मानसिक आरोग्य  सल्ले दिले जात आहेत. यासाठी 1900 हून अधिक समुपदेशकांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे समुपदेशक  प्रथम श्रेणी सेवेच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सल्ले देत आहेत. मनःस्थितीची उदासीनता, झोपेचा त्रास, तणाव आणि चिंता या सर्वात सामान्य समस्या आहेत. समुपदेशकांद्वारे कॉलबॅकच्या माध्यमातून  सुमारे 7000 कॉल्सचा पाठपुरावा करून समुपदेशन करण्यात आले असून त्यांना मानसिक समस्यांचे निराकरण करण्यात यश आले आहे.  ज्यांना तज्ज्ञांच्या उपचारांची आवश्यकता आहे  त्यांना डीएमएचपी  आणि इतर जवळच्या आरोग्य सुविधांसारख्या योग्य सेवांशी यशस्वीरित्या जोडले जात आहे.

परीक्षांच्या हंगामात  परीक्षेच्या ताणाशी संबंधित कॉल्समध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.या सेवेवरून संपर्क करणाऱ्या मानसिक समस्याग्रस्तांना  समुपदेशकांनी सहाय्यक समुपदेशन आणि स्व-सहाय्य कौशल्याच्या आधारे  मदत केली यामुळे  त्यांना अनेक मानसिक समस्यांचे निराकरण करण्यात यश मिळाले. विविध शैक्षणिक संस्थांमधील  अधिकाधिक विद्यार्थी/किशोरांपर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

मुद्रित माध्यमे , रेडिओ आणि समाजमाध्यमे  यांसारख्या विविध माध्यम मंचांद्वारे  टेलि-मानस  सेवांचा प्रचार केला जात आहे. टेलि-मानस सेवा दूरध्वनी करणाऱ्यांना मूलभूत समुपदेशन आणि मानसिक आरोग्य सेवा प्रदान करणे सुरू ठेवेल,यामध्ये  आगामी काळात विद्यमान  महत्त्वाच्या सेवा आणि संसाधने   ई-संजीवनी सह एकत्रित करण्यात येतील. टेलि- मानस सेवेने  9 महिन्यांत 2-लाख दूरध्वनी कॉल्सचा आकडा गाठल्यामुळे, संपूर्ण भारतभर सर्वसमावेशक डिजिटल मानसिक आरोग्य नेटवर्क तयार करण्याचे आणि न पोहोचलेल्या लोकांपर्यंत ही सेवा पोहोचण्याचे   अंतिम उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. .

देशातील मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेला टेलि- मानस उपक्रम, हा एक अभिनव उपक्रम आहे यामुळे दूरध्वनीवरून  करणाऱ्यांची नाव गुप्त ठेवत त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांच्या निराकरणासाठी  आधार मिळू शकेल, यामुळे  सामान्यतः मानसिक आरोग्य समस्यांशी संबंधित दृष्टिकोन बदलेल.

भारताचा राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य  क्षमता बांधणीच्या उपक्रमांद्वारे राष्ट्राच्या मानसिक आरोग्य संबंधित मनुष्यबळाची  निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि त्याचबरोबर मानसिक आरोग्य सेवा प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत विनामूल्य  पोहोचू शकतील हे सुनिश्चित करतो ज्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते अशा  सर्वात असुरक्षित आणि सेवासुविधा न पोहोचलेल्या  समाजातील घटकांवर हा कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो.  टेलि- मानस सेवेने 6 महिन्यांत 1 लाख दूरध्वनी कॉल्सचा आकडा गाठल्यामुळे, संपूर्ण भारतभर एक बळकट  डिजिटल मानसिक आरोग्य नेटवर्क तयार करण्याचे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एका नव्या अध्यायाला सुरुवात केले आहे.

टोल-फ्री मदत  क्रमांक: 14416 किंवा 1-800-891-4416 बहु-भाषेच्या तरतुदीसह कॉलर्सना  सेवांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या आवडीची भाषा निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देतात.

***

N.Joshi/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1941668) Visitor Counter : 163