खाण मंत्रालय
नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 प्रदान करणार
Posted On:
21 JUL 2023 11:56AM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 24 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित समारंभात, प्रतिष्ठेचे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 प्रदान करणार आहेत. कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि खाण, कोळसा आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
खाण मंत्रालय दरवर्षी पुढील तीन श्रेणींमध्ये राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार प्रदान करते:
- राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार
- राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार
- भूविज्ञानाच्या विविध क्षेत्रांसाठीचा राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार
1966 मध्ये सुरु करण्यात आलेले, राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार (एनजीए) हे भूविज्ञान क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी, समर्पण आणि नवोन्मेष प्रदर्शित करणाऱ्या असामान्य व्यक्ती आणि संस्थांच्या कामगिरीला मान्यता आणि प्रशंसा बहाल करतात.
खनिज शोध आणि उत्खनन, मूलभूत भूविज्ञान, मुलभूत भूविज्ञान आणि खाणकाम, खनिज संपत्तीचा लाभ आणि शाश्वत खनिज विकास, या क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जातो.
या वर्षी एनजीए 2022 साठी, विविध पुरस्कार श्रेणी अंतर्गत 168 नामांकने प्राप्त झाली आणि तीन-टप्प्यांमध्ये त्याची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
विविध श्रेणींमध्ये नामांकित एकूण 10 राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कारांमध्ये, एक राष्ट्रीय भूविज्ञान जीवनगौरव एक पुरस्कार, विविध क्षेत्रांमधील आठ राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार आणि एक राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार यांचा समावेश आहे. हे 10 एनजीए पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते 22 भूवैज्ञानिकांना प्रदान केले जातील.
गेल्या चार दशकांपासून हिमालय पर्वतरांगांमध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेले डॉ. ओम नारायण भार्गव यांना यंदाचा राष्ट्रीय भूविज्ञान जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बनारस हिंदू विद्यापीठामधील सहायक प्राध्यापक डॉ. अमिया कुमार सामल यांना राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय महाद्विपाखालील वेगवेगळ्या उपमहा द्विपीय लिथोस्फेरिक आवरणामधील (SCLM) फरक समजून घेण्यात त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.
प्रतिष्ठित भूवैज्ञानिक, विद्वान, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रांमधील धुरीणांच्या उपस्थितीत राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार प्रदान केले जातील.
राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार, निवड पद्धत याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी इंग्रजी प्रसिद्धी पत्रक पहा.
***
Jaydevi PS/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941357)
Visitor Counter : 193