आदिवासी विकास मंत्रालय

नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (नेस्टस) ने प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) आणि वसतिगृह वॉर्डन पदासाठी 6329 रिक्त जागा भरण्यासाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी (इएमआरएस) 2023 च्या कर्मचारी निवड परीक्षेची (इएसएसई) अधिसूचना केली जारी

Posted On: 19 JUL 2023 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जुलै 2023

 

नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (नेस्टस) ही आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी (इएमआरएस) साठी ही संस्था शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी भरती मोहीम राबवत आहे. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) आणि वसतिगृह वॉर्डन पदासाठीच्या 6329 रिक्त जागा भरण्यासाठी इएमआरएस कर्मचारी निवड परीक्षेची (इएसएसइ)-2023 अधिसूचना नेस्टसने जारी केली आहे. यामुळे एकलव्य शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी दर्जेदार मनुष्यबळाचा समावेश केला जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून (19.07.2023) पासून सुरू झाली आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) समन्वयाने नेस्टस खाली दिलेल्या तक्त्यातील टीजीटी आणि वसतिगृह वॉर्डनच्या रिक्त जागा भरण्यासाठी "ओएमआर ( आधारित (पेन-पेपर)" मोडमध्ये ईएसएसई-2023 आयोजित करत आहे. :

Post

Vacancies

TGT

5660

Hostel Warden

669

Total

6329

 

ऑनलाइन अर्जांची तपशीलवार प्रक्रिया, पात्रता निकष आणि प्रत्येक पदासाठी अभ्यासक्रमासह इतर तपशील emrs.tribal.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ईएमआरएस मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे पोर्टल आजपासून 18 ऑगस्ट 2023 पर्यंत या पोर्टलवर अर्ज दाखल करता येतील.

निवासी संकुलात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाची एकलव्य ही एक प्रमुख योजना आहे.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1940852) Visitor Counter : 246