श्रम आणि रोजगार मंत्रालय
चौथ्या G20 रोजगार कार्यगटाच्या बैठकीदरम्यान भारताने ई-श्रम या असंघटित कामगारांचा जगातील सर्वात मोठा डेटाबेस आणि राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलबाबत सादरीकरण केले
भारताच्या G20 अध्यक्षतेखाली चौथ्या रोजगार कार्यगटाच्या बैठकीला आज इंदूरमध्ये प्रारंभ
Posted On:
19 JUL 2023 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2023
भारताच्या G20 अध्यक्षतेअंतर्गत चौथी रोजगार कार्यगटाची बैठक आज मध्य प्रदेशातील इंदूर शहरात सुरू झाली. बैठकीच्या उद्घाटन सत्रात कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव आणि G20 रोजगार कार्यगटाच्या अध्यक्ष आरती आहुजा यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले आणि मागील तीन रोजगार कार्यगटाच्या बैठकांमध्ये झालेल्या चर्चा आणि उपलब्धींचा आढावा घेतला. मंत्रिस्तरीय घोषणापत्राचा मसुदा आणि निष्कर्ष दस्तावेजांवर पुढील सत्रांमध्ये काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या

इंडोनेशिया आणि ब्राझील या सह-अध्यक्ष देशांमधील प्रतिनिधींनीही प्रारंभिक सत्रात निवेदन दिले आणि फलदायी चर्चेद्वारे काम पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली .
भारताने ई-श्रम या असंघटित कामगारांचा जगातील सर्वात मोठा डेटाबेस आणि राष्ट्रीय करिअर सेवा (NCS) पोर्टल संबंधी सादरीकरण केले. ई-श्रम आणि NCS पोर्टल्सवरील सादरीकरण आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींबरोबर सामायिक केले जाईल,ज्यांनी याबाबतीत भारताच्या यशाबद्दल स्वारस्य आणि कुतूहल व्यक्त केले आहे.

बैठकीच्या पुढील सत्रांमध्ये, या दस्तावेजांना अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने मंत्रीस्तरीय घोषणापत्राचा मसुदा आणि निष्कर्षाच्या दस्तावेजांवर चर्चा झाली.
तत्पूर्वी, प्रतिनिधींसाठी सकाळी योगसत्राचे आयोजन करण्यात आले. याशिवाय बैठकीदरम्यान एक छोटासा योगाभ्यास देखील आयोजित करण्यात आला होता. प्रतिनिधींसाठी ऐतिहासिक मांडू फोर्ट सिटीची सहल देखील आयोजित करण्यात आली आहे.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1940803)
Visitor Counter : 188