पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडमधील चमोली वीज दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
19 JUL 2023 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील चमोली येथे वीज दुर्घटनेतील झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊ दे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे तसेच राज्य सरकारच्या स्थानिक प्रशासनाला पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे,की
“अत्यंत क्लेशकारक घटना! उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे अतिशय दु:ख झाले. शोकाकुल कुटुंबियांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करत आहे,तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊ दे, अशी प्रार्थना करत आहे. उत्तराखंडमधील स्थानिक प्रशासन पीडीतांना सर्व प्रकारची मदत करत आहे"
* * *
S.Patil/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1940790)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam