पंतप्रधान कार्यालय
केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
18 JUL 2023 10:09AM by PIB Mumbai
केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक आणि दु:ख व्यक्त केले आहे.
विशेषत: ते दोघे आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना चंडी यांच्याबरोबरच्या विविध आठवणींना मोदी यांनी उजाळा.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“ओमन चंडीजी यांच्या निधनाने आपण एक सहृदय आणि समर्पित नेता गमावला आहे. त्यांनी आपले जीवन जनसेवेसाठी समर्पित केले आणि केरळच्या प्रगतीसाठी कार्य केले. मला त्यांच्याशी झालेल्या विविध भेटींची आठवण होते, विशेषत: जेव्हा आम्ही दोघांनी आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते आणि नंतर मी दिल्लीला गेलो होतो. या दु:खद क्षणी माझ्या सहवेदना त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांसोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”
***
ShilpaP/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1940407)
Visitor Counter : 183
Read this release in:
Assamese
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada