श्रम आणि रोजगार मंत्रालय
2023 च्या मे महिन्यात ईएसआय योजनेंतर्गत 20.23 लाख नवीन कर्मचाऱ्यांची नोंदणी
Posted On:
17 JUL 2023 6:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2023
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) वेतनपटविषयक प्रारंभिक डेटावरून असे आढळून आले आहे की मे 2023 या महिन्यात 20.23 लाख नवीन कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.
मे 2023 या महिन्यात सुमारे 24,886 नवीन आस्थापना नोंदणीकृत झाल्या आहेत आणि या आस्थापना कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या राज्य विमा महामंडळाच्या सामाजिक सुरक्षा छत्राखाली आणल्या गेल्या आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षेची हमी मिळालेली आहे.
या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे की, देशातील तरुणांसाठी अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत जसे की, मे 2023 या महिन्यात नव्याने नोंदणी झालेल्या एकूण 20.23 लाख कर्मचार्यांपैकी 25 वर्षे वयोगटातील 9.40 लाख कर्मचारी नवीन नोंदणीचा बहुतांश भाग आहेत आणि ही संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 47% एवढी आहे.
उपलब्ध वेतनपट डेटा लक्षात घेता त्याचे लिंगनिहाय विश्लेषण असे दर्शविते की, मे 2023 मध्ये महिला सदस्यांची निव्वळ नोंदणी 3.96 लाख एवढी होती. तसेच या डेटावरून असेही निदर्शनात आले की एकूण 71 ट्रान्सजेंडर कर्मचारी देखील मे 2023 या महिन्यात ईएसआय योजनेअंतर्गत नोंदणीकृत झाले आहेत. यावरून हेच सिद्ध होते की कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) आपले फायदे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे.
हा वेतनपट डेटा तात्पुरत्या स्वरूपातला आहे कारण डेटा निर्मिती ही एक सततची प्रक्रिया आहे.
* * *
N.Chitale/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1940246)
Visitor Counter : 136