संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पूरग्रस्त राज्यांमध्ये भारतीय हवाई दलाचे मदतकार्य जोमाने सुरू

Posted On: 14 JUL 2023 3:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2023

 

  1. हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यांमधील सध्याच्या पूर परिस्थितीमध्ये भारतीय हवाई  दल मानवतावादी सहाय्य  आणि आपत्ती निवारण कार्यात पूर्णपणे सहभागी आहे.  गेल्या 48 तासांत  हवाई दलाकडून विमानांची एकूण 40 उड्डाणे करण्यात आली आणि 126 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले  असून 17 टन मदत साहित्य विविध भागात वितरित करण्यात आले आहे.
  2. गेल्या 24 तासांत, हरियाणातील पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम आखण्यात आली होती.  निहारा, अल्लाउद्दीन माजरा, बिशनगड, सेगटा, भुन्नी, मुमनी, सेगटी आणि जनसुई या गावांना एम-17 हेलिकॉप्टरद्वारे धान्य, ताडपत्री, ताजे अन्न आणि पाण्याच्या बाटल्या असलेले मदत साहित्य पुरवण्यात आले.
  3. हवाई दलाचे जवान आणि M-17 आणि चिनूक हेलिकॉप्टर आणि An-32 आणि C-130 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट सह इतर सर्व आवश्यक हवाई वाहतुकीची साधने  बचाव कार्यासाठी  सज्ज ठेवण्यात आली आहेत.  

 

S.Kane/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1939450) Visitor Counter : 147