रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे 2,900 कोटी रुपये खर्चाच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी
Posted On:
13 JUL 2023 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली.
या प्रकल्पांची एकूण लांबी 87 किलोमीटर असून एकूण खर्च 2,900 कोटी रुपये आहे.
कृष्णपट्टणम बंदराला विनाअडथळा आणि सुरक्षित संपर्क सुविधा प्रदान करणे, राष्ट्रीय बृहत योजनेतील नोड्स, औद्योगिक नोड्स आणि नेल्लोर येथील विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये गतिमान सुविधा उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट असल्याचे गडकरी यांनी सांगितले. याशिवाय हे रस्ते प्रकल्प तिरुपतीमधील श्री बालाजी मंदिर आणि श्रीकालहस्तीमधील श्री शिव मंदिर या सारख्या धार्मिक स्थळी प्रवास करणाऱ्या भाविकांची सुरक्षितता आणि सुविधा वाढवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण देशात जलद, विनाअडथळा आणि ऊर्जा-कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1939248)
Visitor Counter : 140