संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाच्या कार्यान्वयन क्षमताना गती देण्यासाठी फ्रान्सकडून 26 राफेल सागरी विमानांच्या खरेदी प्रस्तावांना संरक्षण अधिग्रहण परिषदेची (डीएसी) मंजुरी


खरेदी (भारतीय) श्रेणी अंतर्गत तीन अतिरिक्त स्कॉर्पीन पाणबुड्यांच्या अधिग्रहणालाही मंजूरी

Posted On: 13 JUL 2023 5:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जुलै 2023

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 13 जुलै 2023 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण  परिषदेच्या (डीएसी) बैठकीत तीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. डीएसीने 26 राफेल सागरी विमानांच्या खरेदीसाठी आवश्यकता निकषानुसार  स्वीकृतीला (एओएन) मंजूरी दिली.आंतर-सरकारी कराराच्या (आयजीए) आधारे फ्रेंच सरकारकडून भारतीय नौदलासाठी संबंधित सहाय्यक उपकरणे, शस्त्रे, सिम्युलेटर, सुटे भाग, संबंधित दस्तावेज, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि दळणवळण सहकार्य केले  जाणार आहे. संबंधित विमानांसाठी इतर देश आकारत असलेले  दर आणि सर्व संबंधित बाबी विचारात घेऊन किंमत आणि खरेदीच्या इतर अटींवर फ्रेंच सरकारशी बोलणी केली जातील.  भारताने तयार केलेल्या उपकरणांचे एकत्रीकरण आणि विविध प्रणालींची देखभाल, दुरुस्ती तसेच कार्यान्वयन  (एमआरओ) केन्द्राची  उभारणी योग्य वाटाघाटीनंतर कराराच्या कागदपत्रांमध्ये समाविष्ट केली जाईल.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) द्वारे बांधण्यात येणार्‍या खरेदी  (भारतीय) श्रेणी अंतर्गत तीन अतिरिक्त स्कॉर्पीन पाणबुड्या खरेदीसाठी परिषदेने एओएन मंजूर केले. स्वदेशी सामग्रीचा जास्त उपयोग करणाऱ्या अतिरिक्त पाणबुड्यांच्या खरेदीमुळे भारतीय नौदलाची सामर्थ्य वाढण्याबरोबरच कार्यान्वयन तत्परता राखली जाईल आणि  देशांतर्गत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. पाणबुडी बांधणीत एमडीएलची क्षमता आणि कौशल्य आणखी वाढवण्यातही ते मदत करेल.

याशिवाय, भांडवल संपादन प्रकरणांच्या सर्व श्रेणींमध्ये इच्छित स्वदेशी भाग राखणे साध्य करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या प्रस्तावाला डीएसीने मंजुरी दिली.  स्वदेशी उत्पादनाद्वारे संरक्षण व्यासपीठ/उपकरणे यांचे महत्त्वपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान आणि त्याचे चक्र टिकवून ठेवण्यासाठी ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यात यामुळे  मदत होईल.

 

N.Chitale/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1939235) Visitor Counter : 212