रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

1 जानेवारी 2025 पासून उत्पादित एन 2 आणि एन 3 श्रेणीतील मोटार वाहनांच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवणे अनिवार्य करणारी मसुदा अधिसूचना जारी

Posted On: 11 JUL 2023 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2023

देशात 1 जानेवारी 2025 पासून उत्पादित केल्या जाणाऱ्या एन 2 आणि एन 3 श्रेणीतील मोटार वाहनांच्या केबिनमध्ये वातानुकूलित  यंत्रणा  बसवणे अनिवार्य करणारी मसुदा अधिसूचना  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने  10 जुलै 2023 रोजी  जारी केली आहे .

वातानुकूलित  यंत्रणा बसवलेल्या केबिनची कार्यक्षमता चाचणी वेळोवेळी बदल केलेल्या आयएस  14618: 2022 नुसार असेल. अधिसूचनेच्या तारखेपासून 30  दिवसांच्या आत संबंधितांकडून अभिप्राय /सूचना मागवण्यात आल्या आहेत.त्या  comments-morth[at]gov[dot]in वर पाठवण्याचे आवाहन केले आहे.

राजपत्र अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

S.Kane/S.Chavan/ P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1938740) Visitor Counter : 178