नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचा युरोपीय संघ हवाई सुरक्षा संस्थेसोबत मानवरहित विमान प्रणाली आणि नवोन्मेषी हवाई वाहतुकीसाठी सामंजस्य करार

Posted On: 05 JUL 2023 6:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जुलै 2023

भारताच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने(डीजीसीए) मानवरहित विमान प्रणाली आणि नवोन्मेषी हवाई वाहतूक या क्षेत्रातील सहकार्यासाठी युरोपीय संघ हवाई सुरक्षा संस्थेसोबत(ईएएसए) एक सामंजस्य करार केला आहे. दोन्ही नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणांमध्ये मानवरहित विमान प्रणाली आणि नवोन्मेषी हवाई वाहतूकविषयक सहकार्यावर या सामंजस्य करारात भर दिला जाणार आहे.

या सहकार्यामध्ये डीजीसीए आणि ईएएसए यांच्यात प्रमाणीकरणाचे मापदंड आणि पर्यावरणीय मापदंड आणि प्रमाणीकरणासाठी संबंधित आवश्यकता आणि मानवरहित विमान प्रणालीचा वापर आणि नवोन्मेषी हवाई वाहतूक या क्षेत्रातील सहकार्याचा  समावेश आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना परवाना देणे, प्रशिक्षण, हवाई वाहतूक व्यवस्थापन आणि मानवरहित विमान प्रणाली वाहतूक व्यवस्थापन(UTM) मानके आणि सेवा अंतर्भूत आहेत.

दोन्ही प्राधिकरणांदरम्यान तंत्रज्ञानविषयक विकास आणि या क्षेत्रातील संशोधन संबंधित हितधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या रणनीतीसंदर्भात नियमितपणे ज्ञानाची देवाणघेवाण होत राहील हे देखील हा सामंजस्य करार सुनिश्चित करेल. त्याशिवाय या सामंजस्य करारामुळे डीजीसीए आणि ईएसीए यांना या क्षेत्राशी संबंधित परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करता येईल.

या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे मानकांमध्ये समानता येण्याबरोबरच भारतीय मानवरहित हवाई क्षेत्राची वृद्धी अतिशय वेगाने होण्याची अपेक्षा आहे.

20 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्लीत झालेल्या युरोपीय संघ- भारत हवाई क्षेत्र परिषदेत डीजीसीएने मानवरहित विमान प्रणाली आणि नवोन्मेषी हवाई वाहतुकीसंदर्भात  युरोपीय संघाच्या हवाई सुरक्षा संस्थेसोबत एका इरादा पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

 

 

 N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1937578) Visitor Counter : 169