पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची उत्पादन आणि विक्री यात पहिल्याच तिमाहीत सर्वोत्तम कामगिरी

Posted On: 05 JUL 2023 1:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जुलै 2023

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने आर्थिक वर्ष 2023-24 (Q1 FY24) यात पहिल्या तिमाहीत उत्पादन आणि विक्री दोन्ही याबाबतीत विक्रमी कामगिरी केली आहे.

पहिल्या तिमाहीत गरम धातू, कच्चे पोलाद आणि विक्री योग्य स्टीलचे उत्पादन,अनुक्रमे 5.037 दशलक्ष टन 4.667 दशलक्ष टन, आणि 4.405 दशलक्ष टन एवढे झाले असून,या तिमाहीतील सर्वोत्तम कामगिरी म्हणून नोंदवण्यात आले आहे.ही संख्या मागील सर्वोत्तम कामगिरीच्या तुलनेत अनुक्रमे 7%, 8% आणि 8% इतक्या उल्लेखनीय रीतीने वाढल्याचे दिसून आले आहे.

गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत (CPLY)सुमारे 24% वाढ दर्शवत  स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (SAIL)  पहिल्या तिमाहीत 3.9 दशलक्ष टन इतकी विक्री करून आपली आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे. जास्तीत जास्त क्षमतेचा वापर आणि ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यावर सतत लक्ष केंद्रित केल्यामुळे ही  विक्रमी कामगिरी करणे साध्य झाल्याचे सिद्ध झाले आहे.

 

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1937456) Visitor Counter : 166