माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मानसाठी प्रवेशिका भरण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2023 पर्यंत वाढवण्यात आली
Posted On:
04 JUL 2023 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2023
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 च्या प्रसाराची व्याप्ती वाढवण्यातील प्रसारमाध्यमांची सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी विचारात घेऊन, आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान (AYDMS) 2023 साठी प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माध्यम संस्था 8 जुलै 2023 पर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान , 2023 साठी त्यांच्या प्रवेशिका आणि आशय सामग्री पुढील लिंक वर पाठवू शकतात : aydms2023.mib[at]gmail[dot]com
सहभागासाठीच्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना, माहिती आणि प्रसारण मंत्रालय ( https://mib.gov.in/) आणि पत्र सूचना कार्यालय (https://pib.gov.in) यांच्या संकेतस्थळावर पाहता येतील.
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937262)
Visitor Counter : 174