सांस्कृतिक मंत्रालय
सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (IBC) उद्या राष्ट्रीय संग्रहालयात आषाढ पौर्णिमा साजरी करणार
Posted On:
02 JUL 2023 2:50PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (IBC), राष्ट्रीय संग्रहालय, जनपथ, नवी दिल्ली येथे 3 जुलै, 2023 रोजी येणारी आषाढ पौर्णिमा धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून साजरी करणार आहे. हा आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचा वार्षिक प्रमुख कार्यक्रम आहे आणि बुद्ध अनुयायांसाठी बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमेनंतरचा दुसरा सर्वात पवित्र दिवस आहे.
या कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे व्हिडिओ संबोधन सादर होणार आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या लुंबिनी (नेपाळ) येथील “इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेज” या
विशेष प्रकल्पावरील चित्रपटाचे प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी बुद्ध पौर्णिमेला नेपाळमधील लुंबिनी येथे या केंद्राची पायाभरणी केली होती.
या कार्यक्रमात, 'आषाढ पौर्णिमेचे महत्त्व' या विषयावर परमपूज्य 12 वे चामगोन केंटिंग ताई सितुपा यांचे धम्म भाषण तसेच सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मिनाक्षी लेखी यांचे विशेष भाषण यांचा समावेश असेल. इतर अनेक मान्यवर, बौद्ध संघांचे कुलगुरू, प्रख्यात तज्ञ, विद्वान आणि नवी दिल्लीस्थित मुत्सद्दी प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ भारताचा ऐतिहासिक वारसा, बुद्धाच्या केवलज्ञानाची भूमी, धम्म चक्राचा उदय आणि महापरिनिर्वाण या गोष्टी लक्षात घेऊन शाक्यमुनींचे पवित्र अवशेष असलेल्या जनपथ येथील राष्ट्रीय संग्रहालयात आषाढ पौर्णिमा सोहळ्याचे आयोजन करत आहे.
सारनाथ येथेच बुद्धांनी पहिला उपदेश केला आणि धम्मचक्र गतिमान केले. आषाढ पौर्णिमेचा शुभ दिवस जो भारतीय चंद्र दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी येतो याला श्रीलंकेत इसला पोया तर थायलंडमध्ये असन्हा बुचा म्हणूनही ओळखले जातो. केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर गौतम बुध्दांनी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी 'डीयर पार्क' ऋषिपतन मृगदया जे आजच्या वाराणसी जवळील सारनाथ येथे आहे तिथे पहिल्या पाच तपस्वी (पंचवर्गीय) शिष्यांना पहिला संदेश दिला होता.
भिख्खु आणि भिख्खुणींचा पावसाळी हंगामाचा निवासकाळ (वर्षा वास) देखील या दिवसापासून सुरू होतो. वर्षा वास जुलै ते ऑक्टोबर या तीन चांद्र महिन्यांपर्यंत चालतो. या महिन्यादरम्यान भिख्खु आणि भिख्खुणी ठराविक मंदिरांमध्ये एकाच ठिकाणी राहतात आणि मुख्यतः गहन ध्यानात लीन राहतात. हा दिवस बौद्ध आणि हिंदू दोन्ही समुदायांकडून गुरुपौर्णिमा अर्थात आपल्या गुरूंप्रति आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1936946)
Visitor Counter : 185