विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हे स्टार्ट अप्स बौद्धिक संपदा हक्क संरक्षणाचे उद्दिष्ट आहे -  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह


स्टार्टअप्स वातावरणाचा विकास आणि त्यांची क्षमतावृद्धीसाठी एकमेकांना पूरक ठरतील अशा अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणल्या

Posted On: 02 JUL 2023 2:17PM by PIB Mumbai

 

स्टार्ट अप्स बौद्धिक संपदा हक्क संरक्षणाचे नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान , पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  जितेंद्र सिंह यांनी केले.

नवी दिल्लीत राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा इथे CSIR ने आयोजित केलेल्य  राष्ट्रीय बौद्धिक संपदा उत्सव या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जितेंद्र सिंह म्हणाले, स्टार्ट-अप्सना उद्योगांशी जोडण्यासोबतच  पेटंट आणि ट्रेडमार्क यासह बौद्धिक संपदा  हक्कांसाठी अर्ज केल्यास संशोधनाला तसंच भारतातील उद्योजकतेलाही चालना मिळेल. नरेंद्र मोदी सरकारने 2016 मध्ये IPR कायदा आणल्यानंतर  ट्रेडमार्कसाठी नोंदणी प्रकियेला एक वर्षाहून जास्त वेळ लागत असे तो वेळ एका महिन्यावर आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

यानंतर स्टार्टअप्स बौद्धिक संपदा हक्क संरक्षण योजना आणली. ज्यामध्ये  बौद्धिक संपदा ह्क्क यासाठी अर्ज दाखल करण्यावर 80 टक्के तर  उद्योग आणि कंपन्यांसाठी 40  ते 50 टक्के सवलत देण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

स्टार्टअप्स वातावरणाचा विकास व्हावा  आणि त्यांची क्षमतावृद्धी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांना पूरक ठरतील अशा अनेक योजना आणल्या.  तुम्ही स्टार्टअप्सना जोड देऊ शकता. उदाहरणार्थ तुमच्याकडे मुद्रा योजना असेल, जी तुम्हाला कोणत्याही ग्रॅच्युइटी आणि तारणाशिवाय तसंच व्याजरहित  कर्ज म्हणजे जवळपास विनामूल्य कर्ज देते.  असे जितेंद्र सिंह म्हणाले.

गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान आणि वैज्ञानिकांना प्रतिष्ठा मिळवून दिली. आणि हा मुद्दा आंतरराष्टीय व्यासपीठावरही नेला आहे. त्यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका भेटीतसुद्धा सेमीकंडक्टर, ते अंतराळ आणि आंतराष्ट्रीय अंतराळस्थानक, आर्टेमिज ऍकॉर्ड्स् या अशा अनेक विज्ञानाशी संबधित बाबी त्यांच्या संयुक्त निवेदनात होत्या. असं जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं.

जागतिक  संशोधन निर्देशांकात 81 वरुन 41 अशा एकतीस पायऱ्या  आपण वर आलो. आपल्याकडे स्टार्टअप्सचे वातावरण खूप उशीरा उदयाला आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या वेळी  लाल किल्ल्यावरुन  आवाहन केले होते आणि त्यानंतर तीन वर्षात आपण जागतिक स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहोत.

पारंपरिक ज्ञानाची ठेव डिजिटल स्वरुपात ठेवून त्याची सांगड आधुनिक वैज्ञानिक संशोधनासोबत घालण्याचे  आवाहन यावेळी सिंह यांनी केले आणि या सर्वाचे औद्योगिकीकरण करत आपण खादी, अरोमा मिशन आणि लव्हेंडर लागवडीसारख्या क्षेत्रात प्रगती करु शकतो , असे ते म्हणाले.

***

S.Patil/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1936942) Visitor Counter : 182