गृह मंत्रालय
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत महाराष्ट्रासह 19 राज्य सरकारांना 6,194.40 कोटी रुपये देण्यास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 2023-24 या वर्षात 9 राज्यांना एसडीआरएफमध्ये केंद्रीय वाटा म्हणून 3649.40 कोटी रुपये देण्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे
केंद्र सरकारने 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारे वर्ष 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी एसडीआरएफकरिता 1,28,122.40 कोटी रुपयांची तरतूद केली आहे
Posted On:
30 JUN 2023 7:50PM by PIB Mumbai
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत 19 राज्य सरकारांना 6,194.40 कोटी रुपये देण्यास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज मंजुरी दिली.
या रकमेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये केंद्रीय वाटा म्हणून 2022-23 या वर्षासाठी चार राज्यांकरिता (छत्तीसगड, मेघालय, तेलंगणा, उत्तर प्रदेश) 1,209.60 कोटी रुपये आणि वर्ष 2023-24 साठी 15 राज्यांकरिता (आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, त्रिपुरा) 4,984.80 कोटी रुपये समाविष्ट आहेत. हा निधी वितरित केल्यामुळे राज्यांना चालू पावसाळी हंगामात उपाययोजना करण्यात मदत होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 2023-24 या वर्षात 9 राज्यांना एसडीआरएफमध्ये केंद्रीय वाटा म्हणून 3649.40 कोटी रुपये देण्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारे वर्ष 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी एसडीआरएफकरिता 1,28,122.40 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
***
R.Aghor/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1936544)
Visitor Counter : 159