संरक्षण मंत्रालय
‘भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरणासाठीच्या आवश्यकता: उद्योगांसाठी संधी’ या विषयावरील परिषद आणि बी टू बी सत्राचे आयोजन
Posted On:
26 JUN 2023 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2023
भारतीय नौदलानं आज नवी दिल्लीत फेडरेशन ऑफ इंडियन कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (फिक्की) सहकार्यानं परस्परसंवादी परिषद आणि बिझनेस टू बिझनेस (बी टू बी) सत्र आयोजित केले होते. ‘भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरणासाठीच्या आवश्यकता: उद्योगांसाठी संधी’ हा परिषदेचा विषय होता. फिक्कीच्या हरी शंकर सिंघानिया आयोग सभागृहात हा कार्यक्रम झाला.
भारतीय नौदलाचे चीफ ऑफ मटेरियल व्हाईस अॅडमिरल संदीप नैथानी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी बीजभाषण केले.
ZFB1.jpg)
या परिषदेने उद्योग / सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एमएसएमई) / स्टार्टअप्सना भारतीय नौदलाच्या कर्मचार्यांशी संवाद साधण्याची एक अनोखी संधी दिली आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनण्यासाठी भारतीय नौदलासाठीच्या स्वदेशीकरण योजना / प्रमुख गरजा यावर एकत्रितपणे चर्चा करण्यासाठी सर्व भागधारकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
भारतीय नौदल आणि उद्योग / सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग / स्टार्टअप यांच्यात बी 2 बी संवाद आयोजित करण्यात आला आणि नौदलाच्या प्रमुख स्वदेशीकरण आवश्यकतांवर चर्चा करण्यात आली.
या परिषदेने केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला अनुसरून स्वदेशीकरणाला चालना दिली.
परिषदेत 100 हून अधिक उद्योग / एमएसएमई / स्टार्टअप सहभागी झाले होते.
(1)ESC4.jpg)
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1935376)
Visitor Counter : 160