कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एन सी जी जी अर्थात राष्ट्रीय सुशासन केंद्राने मालदीवच्या नागरी सेवकांच्या 24 व्या तुकडीला दिलं यशस्वी प्रशिक्षण


महिलांना प्राथमिक सुविधा पुरवून त्यांचे सबलीकरण करणे हे आर्थिक वाढीसाठी उत्प्रेरकाचं काम करतं - एन सी जी जी महासंचालक

Posted On: 25 JUN 2023 1:35PM by PIB Mumbai

 

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने मालदीवच्या नागरी सेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन आठवड्यांच्या क्षमता बांधणीच्या कार्यक्रमाची सांगता 23 जून 2023 रोजी झाली. प्रशासन आणि सुशासन या क्षेत्रात 2024 पर्यंत 1000 नागरी सेवकांच्या कौशल्य आणि क्षमता वाढीसाठी एन सी जी जी ने मालदीव सरकार बरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारानुसार एन सी जी जी ने मालदीवच्या 685 अधिकाऱ्यांना याआधीच प्रशिक्षण दिलं आहे. मालदीवच्या नागरी सेवकांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रमाची यशस्वी सांगता हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजाऱ्यांना प्राधान्यया दृष्टिकोनाचा पुरावा म्हणून सामायिक मूल्ये आणि सहकार्याच्या भावनेचे अभिसरण घडवून आणते.

Image

राष्ट्रीय सुशासन केंद्राचे महासंचालक भरत लाल यांनी निरोप समारंभाचं अध्यक्ष स्थान भूषवलं. नागरिकांचं जीवनमान सुधारण्यावर ठोस लक्ष केंद्रित करून अधिका-यांनी त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि सकारात्मक बदल घडवत सर्वांगीण विकासाला चालना देणार्‍या मूर्त कृतींमध्ये त्याचं रूपांतरण करण्याचं आवाहन भरत लाल यांनी केलं. गृहनिर्माण, स्वयंपाकाचा गॅस, शिक्षण, आरोग्यसेवा, वित्तीय सेवा आणि कौशल्य विकास यासह नागरिकांच्या इतर सर्व गरजा सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अटळ प्रतिबद्धता ध्यानात ठेऊन सर्वांचे राहणीमान सुलभ करण्यासाठी अधिकाऱ्यांनी या उपक्रमांचे अनुकरण करण्याची आणि महत्त्वपूर्ण प्रगती करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या मूलभूत सुविधा कार्यक्षमतेने पोहोचवण्याच्या त्यांच्या प्रयत्नात कोणतीही कसर न ठेवता वेगात आणि उच्च श्रेणीत काम करण्याच्या महत्त्वावर महासंचालकांनी भर दिला.

Image

24 तास पाणी आणि वीज पुरवठा तसेच पुरेशी स्वच्छता सुविधा यासारख्या अत्यावश्यक सोयी सुविधांच्या आधारे महिलांसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याचं महत्त्व महासंचालकांनी अधोरेखित केलं. मूलभूत सुविधांच्या आधारे महिलांचे सक्षमीकरण केवळ आर्थिक परिणामांना चालना देत नाही तर स्त्री पुरुष समानता देखील वाढवते असं त्यांनी सांगितलं. आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांचा समान सहभाग सुनिश्चित करून तसंच त्यांच्या मानवी भांडवलाची पूर्ण क्षमता ओळखून सहकारी संस्था शाश्वत विकासाला चालना देऊ शकतात, असे ते म्हणाले.

24 व्या क्षमता बांधणी कार्यक्रमात प्रशासनाचा बदलता चेहरा, केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली, भारत मालदीव संबंध, आधार: सुशासनाचे एक साधन, सार्वजनिक धोरणांची अंमलबजावणी, महिला समावेशक प्रशासन, सार्वजनिक प्रशासनात सृजनशीलता, डिजिटल प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरण, स्मार्ट सिटी विकास, सर्वांसाठी गृहनिर्माण व्यवस्था, डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ, विविध विकास योजनांच्या माध्यमातून सर्वोत्तम सेवापद्धती, शहरी प्रशासन, पिण्याच्या पाण्यासाठी कमी किमतीत पृथक्करण, हवामान बदल, पर्यटन, जल जीवन मिशन, ई-प्रशासन आणि डिजिटल इंडिया यासारखे देशभरात आखलेले विविध उपक्रम एन सी जी जी ने सामायिक केले अशी माहिती अभ्यासक्रम समन्वयक डॉ. बी.एस. बिश्त यांनी कार्यक्रमाचा समग्र आढावा घेताना दिली.

***

S.Tupe/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1935187) Visitor Counter : 149