संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अमेरिका संरक्षण प्रवेग तंत्राचा (इंडस-एक्स) वॉशिंग्टनमध्ये आरंभ

Posted On: 22 JUN 2023 9:09AM by PIB Mumbai

भारत-अमेरिका (इंडस-एक्स) म्हणजेच भारत-अमेरिका संरक्षण प्रवेग परिसंस्था अभियानाचा 21 जून 2023 रोजी अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी, येथे एका कार्यक्रमात आरंभ करण्यात आला. इंडस-एक्स कार्यक्रमाचे आयोजन आईडीईएक्स, अर्थात संरक्षण उत्कृष्टतेसाठी नवकल्पना, संरक्षण मंत्रालय, संरक्षण विभाग आणि– भारत उद्योग परिषद (यूएसआईबीसी) द्वारे करण्यात आले होते.

संरक्षण उद्योग प्रोत्साहनचे संयुक्त सचिव अनुराग बाजपेयी यांनी 20 आणि 21 जून 2023 रोजी दोन दिवसीय इंडस-एक्स कार्यक्रमात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. भारत आणि यूएस सरकारचे प्रतिनिधी, संरक्षण स्टार्ट-अप, थिंक टँक इनक्यूबेटर, गुंतवणूकदार, उद्योग आणि इतर भागधारक यांचे स्वागत 20 जून 2023 रोजी करण्यात आले होते. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले.

अमेरिकी हवाई दलाचे सचीव, फ्रँक केंडल, यांनी 21 जून रोजी इंडस-एक्स कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केले. भारत-अमेरिका संबंध झपाट्याने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही देशांच्या स्टार्टअप्समध्ये नावीन्यपूर्ण सखोल तंत्रज्ञानात, विशेषत: अंतराळ आणि कृत्रीम प्रज्ञा (AI) क्षेत्रात सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता आहे, यावर त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमात भारतीय आणि अमेरिकी स्टार्ट-अप्सद्वारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे संयुक्त प्रदर्शन देखील ठेवण्यात आले होते. 15 भारतीय स्टार्ट-अप्स आणि 10 अमेरिकी स्टार्ट-अप्सनी, सागरी, कृत्रीम बुद्धीमत्ता, स्वायत्त प्रणाली आणि अंतराळाच्या अनेक कार्यक्षेत्रात, भारतीय आणि अमेरिकी भागधारकांनी त्यांच्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले.

दोन पॅनल चर्चा आणि दोन राऊंड टेबल चर्चांचे आयोजन करण्यात आले, ज्यात सरकार, शैक्षणिक आणि उद्योग विशेषत: स्टार्टअप्ससह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. निर्यात नियंत्रण नियमावलीवरही चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमात इंडस-एक्स फॅक्टशीट प्रसिद्ध करण्यात आले.

 

***

S.Thakur/S.Mohite/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1934459) Visitor Counter : 224