संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरातील 11 लाखांहून अधिक एनसीसी छात्रसैनिकांनी केला योगाभ्यास

Posted On: 21 JUN 2023 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2023

 

राष्ट्रीय छात्र सेनेने  (एनसीसी)  21 जून 2023 रोजी 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण भारतभर साजरा केला. विविध ठिकाणी मिळून  11 लाख छात्रसैनिकांच्या   सहभागासह   उत्साहात साजरा केला.

देशाच्या उत्तरेकडील लेह ते दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत  आणि पश्चिमेकडील द्वारका ते पूर्वेकडील तेजूपर्यंत देशभरातील उद्याने, मोकळी  मैदाने , शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योग सत्रे आयोजित करण्यात आली होती.

राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक  लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह , एव्हीएसएम  व्हीएसएम, यांनी दिल्ली कटक मंडळातील  सर्व 3 सेवांमधील छात्रसैनिकांच्या उत्साहपूर्ण योग सत्राचे  अध्यक्षपद भूषवले.“हर आंगन योग” आणि “वसुधैव कुटुंबकमसाठी योग” या विषयाचे सार स्पष्ट करताना त्यांनी सर्वांना जीवनात योगाभ्यासाचा  अवलंब करण्याचे आवाहन केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, एनसीसीने छात्रसैनिकांसाठी  सराव सत्रे आयोजित केली.   छात्रसैनिकांना  वैयक्तिक आरोग्यासंदर्भात योगाभ्यासाचे महत्व समजावून सांगणे आणि समाजाप्रती एकतेचा आणि सजगतेचा संदेश देणे हे या सत्राचे उद्दिष्ट होते.

उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश देशातील तरुणांच्या मनात आणि हृदयात रुजेल हे सुनिश्चित करत , या कार्यक्रमाद्वारे या इव्हेंटद्वारे एनसीसीने पुन्हा एकदा योग तंदुरुस्ती  आणि आरोग्याचा संदेश देशात पसरवण्याचे कार्य पुन्हा एकदा हाती घेतले आहे. 

 

* * *

S.Bedekar/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1934172) Visitor Counter : 89