पंतप्रधान कार्यालय
खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि वैज्ञानिक संवादक नील दे ग्रासे टायसन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
Posted On:
21 JUN 2023 12:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2023
सुविख्यात अमेरिकन खगोल वैज्ञानिक, लेखक आणि वैज्ञानिक संवादक नील दे ग्रासे टायसन यांनी आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
युवकांमध्ये वैज्ञानिक वृत्ती आणि विचार रुजवण्याबद्दल पंतप्रधान आणि नील टायसन यांच्यात विचारांची देवघेव झाली. अंतराळ क्षेत्रात भारताची वेगाने होणारी प्रगती तसेच, भारताने हाती घेतलेली विविध अवकाश अभियाने यांच्याविषयीही त्यांनी सविस्तर चर्चा केली.
भारताने नुकत्याच आणलेल्या राष्ट्रीय अवकाश धोरणाअंतर्गत, खाजगी क्षेत्रे आणि अभ्यासक यांच्यातील समन्वयाच्या संधी या विषयावरही दोघांमधे चर्चा झाली.
* * *
R.Aghor/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1933968)
Visitor Counter : 171
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam