रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गांच्या सर्वसमावेशक विकासासाठी ‘नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म’ सुरु केले
Posted On:
20 JUN 2023 4:50PM by PIB Mumbai
ज्ञान आणि अभिनव सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ‘नॉलेज शेअरिंग’ प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. एनएचएआय संकेतस्थळावर होस्ट केलेला, हा उपक्रम प्राधिकरणाला रस्त्यांची रचना , बांधकाम, रस्ते सुरक्षा, शाश्वत पर्यावरण आणि संबंधित क्षेत्रांसारख्या विषयांशी संबंधित ज्ञान आणि माहिती सामायिक करू इच्छिणाऱ्या तज्ञ आणि नागरिकांशी सहकार्य करण्यास मदत करेल. हा मंच जगभरातील सर्वोत्कृष्ट पद्धती सामायिक करण्याला प्रोत्साहन देईल आणि देशातील राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासात योगदान देईल.
एनएचएएआय वेब पोर्टल https://ksp.nhai.org/kb/ वर सर्वोत्तम पद्धती व्हिडिओ क्लिप, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि पीडीएफ फाइल्सच्या स्वरूपात अपलोड केल्या जाऊ शकतात. या मंचावर अपलोड केलेल्या माहितीचा एनएचएएआय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाईल आणि अंमलबजावणीसाठी त्याचे मूल्यमापन केले जाईल.
अभिनव आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, एनएचएआय राष्ट्रीय महामार्गाच्या पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करत आहे. फ्लाय-अॅश आणि प्लॅस्टिक कचरा यांसारख्या पुनर्नवीकरण केलेल्या सामग्रीच्या नाविन्यपूर्ण वापराव्यतिरिक्त, एनएचएआय शाश्वत आणि पर्यावरण-स्नेही पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात पुनर्नवीकरण केलेले डांबर (RAP) आणि पुनर्नवीकरण केलेले अन्य घटक (RA) वापरण्यास प्रोत्साहन देत आहे.
अत्याधुनिक बोगदे, आधुनिक पूल, वन्यजीव कॉरिडॉर आणि द्रुतगती मार्गांच्या विकासासह, राष्ट्रीय महामार्गाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी व्यापक सहभाग असणे महत्त्वाचे आहे. हा नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म तज्ञ आणि नागरिकांना सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करेल.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1933734)
Visitor Counter : 167