वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार वाटाघाटीच्या दहाव्या फेरीविषयी संयुक्त निवेदन
भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारासाठीच्या वाटाघाटीची दहावी फेरी
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2023 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2023
भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये मुक्त व्यापार करार करण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटीची दहावी फेरी 09 जून 2023 रोजी संपली.
मागील फेऱ्यांप्रमाणे, या दहाव्या फेरीचेही मिश्र पद्धतीने आयोजन केले होते. ब्रिटनचे अनेक अधिकारी वाटाघाटीसाठी नवी दिल्लीला आले, तर इतर प्रतिनिधी आभासी माध्यमाव्दारे उपस्थित होते.
मुक्त व्यापार करारासाठी विविध प्रकारच्या 10 धोरण क्षेत्रांविषयी, स्वतंत्र 50 सत्रांमध्ये तांत्रिक बाबींवर चर्चा झाली. प्रतिनिधींनी या धोरण क्षेत्राविषयी तपशीलवार मसुदा करण्याविषयी चर्चा केली.
येत्या महिन्यामध्ये या वाटाघाटीची अकरावी फेरी आयोजित करण्यात येणार आहे.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1933515)
आगंतुक पटल : 155