विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोणताही भेदभाव न करता मतपेटीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सर्वांचा समान विकास’ या मंत्रावर विश्वास ठेवतात: डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 18 JUN 2023 5:53PM by PIB Mumbai

 

मतपेटीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात प्रत्येक क्षेत्राचा समान विकास केला असून सर्वांना न्याय दिला आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.

पंतप्रधानांच्या याच वृत्तीचे पालन करत उधमपूर-कथुआ-दोडा या आपल्या संसदीय मतदारसंघात अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न केला आहे, आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे केडियां-गडवाल पूल आहे. हा पूल गेल्या अनेक दशकांपासूनची दीड पंचायतींची मागणी पूर्ण करण्यासाठी 150 कोटी खर्चून बांधण्यात आला,  असे डॉ जितेंद्र सिंह यांनी भव्य जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले.

यावेळी डॉ जितेंद्र सिंह यांनी खासदार म्हणून गेल्या 9 वर्षात आणलेल्या मोठ्या प्रकल्पांची माहिती देणाऱ्या  कॉफी टेबल पुस्तकाचे लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री हरदीप सिंह  पुरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. "उधमपूर-कथुआ-दोडा" संसदीय मतदारसंघ हा देशातील 550 संसदीय मतदारसंघांपैकी भारतातील सर्वात विकसित मतदारसंघ आहे, गेल्या नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड विकास झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

या मतदारसंघाने 'जांभळ्या क्रांतीचे  उगमस्थान म्हणून भारतात आणि जगात आपले नाव कमावले आहे या क्रांतीने केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नव्हे तर देशभरात 3000 हून अधिक कृषी-तंत्रज्ञान स्टार्ट-अप्सना जन्म दिला आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. या संसदीय मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहन दिलेल्या स्टार्ट-अप चळवळीत योगदान देण्याची सर्व क्षमता आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

***

S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1933296) Visitor Counter : 146