पंतप्रधान कार्यालय

पहिल्या आदिवासी क्रीडा महोत्सवाच्या उपक्रमाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 14 JUN 2023 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली :-14 जून, 2023.

भुवनेश्वरच्या कलिंगा समाज विज्ञान संस्थेमध्‍ये आयोजित केलेल्या पहिल्या आदिवासी क्रीडा  महोत्सवाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या क्रीडा महोत्सवाचे आयोजन म्हणजे एक.मोठी सुरुवात असून देशाला नावलौकीक मिळवून देण्यामध्‍ये आदिवासी खेळाडूंची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

अमृत महोत्सवाच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी  व्टिट केले आहे :-  

‘’आमच्या क्रीडा जगतामध्‍ये एक मोठा प्रारंभ! जागतिक स्पर्धेमध्‍ये भारताची ओळख निर्माण करण्‍यामध्‍ये आदिवासी खेळाडूंची महत्वपूर्ण भूमिका आहे. अशा प्रयत्‍नांमुळे देशाला या समुदायातून नवनवीन प्रतिभावंत खेळाडू मिळतील.‘’

***

Sonal T/Suvarna B/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1932480) Visitor Counter : 197