माहिती आणि प्रसारण मंत्रालय
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातमधील द्वारका येथील आकाशवाणीचा टॉवर उतरवण्यात आला
प्रविष्टि तिथि:
14 JUN 2023 4:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2023
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातमधील द्वारका येथील आकाशवाणीचा पोलादी टॉवर उतरवण्यात आला आहे. 90 मीटर उंचीच्या या टॉवरला , दोरीचा आधार असल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये, तसेच आजूबाजूच्या परिसरात जीवित आणि मालमत्तेची हानी कमी व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. एनआयटी सुरत आणि सीसीडब्ल्यू यांनी या पस्तीस वर्ष जुन्या असलेल्या टॉवरचे सुरक्षा ऑडिट केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, या पथकाने जानेवारी 2023 मध्ये हा टॉवर पाडण्याची शिफारस केली होती. उपलब्ध साधनांचा वापर करून, द्वारका येथून प्रसारण सेवा पूर्ववत करण्याचे काम आकाशवाणी करत आहे.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1932313)
आगंतुक पटल : 202