युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
198 खेळाडूंसह 280 सदस्यांचा समावेश असलेला भारतीय संघ विशेष ऑलिम्पिक - उन्हाळी क्रीडा स्पर्धेसाठी बर्लिनला रवाना
प्रविष्टि तिथि:
14 JUN 2023 11:17AM by PIB Mumbai
198 खेळाडूंसह 280 सदस्यांचा समावेश असलेला भारतीय संघ 12 जून रोजी विशेष ऑलिम्पिक जागतिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर्मनीतील बर्लिन येथे रवाना झाला.
प्रवासाला निघण्यापूर्वी 8 जून रोजी झालेल्या निरोप समारंभात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांना भेटण्याची संधी संघाला मिळाली.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांनी विशेष ऑलिम्पिकमधील भारतीय चमूच्या सहभागासाठी 7.7 कोटी रुपये निधी मंजूर केला असून आजपर्यंतची स्पर्धेसाठी मंजूर केलेली सर्वाधिक रक्कम आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली येथे या जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी संघाचे पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिरही पार पडले होते. या जागतिक स्पर्धेत 190 देशांमधून 7000 हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.
17 ते 25 जून दरम्यान होणाऱ्या या भव्य स्पर्धेत 16 विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू पदकांसाठी लढताना पहायला मिळणार आहेत.
***
Sonal T./Sushama K/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1932223)
आगंतुक पटल : 222