युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
मीराबाई चानू आणि बिंदियाराणी देवी यांच्या अमेरिकेत सेंट लुईस येथे प्रशिक्षण घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता
Posted On:
13 JUN 2023 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2023
ऑलिम्पिक पदक विजेती भारोत्तोलक मीराबाई चानू आणि राष्ट्रकुल स्पर्धा पदकविजेती भारोत्तोलक बिंदियाराणी देवी यांच्या अमेरिकेत सेंट लुईस येथे प्रशिक्षण घेण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिंपिक सेलने नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. टॉप्स अर्थात टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अंतर्गत या दोघींना आता या परदेशी प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहता येणार आहे.
सेंट लुईस स्क्वॉट विद्यापीठामध्ये डॉ. एरॉन हॉर्शिग यांच्या नेतृत्वाखाली या दोघी प्रशिक्षण घेतील. आगामी आशियाई खेळांच्या पार्श्वभूमीवर या दोघींच्या कौशल्य विकासावर शिबिरात मेहनत घेतली जाईल. 65 दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिरात त्यांच्यासोबत भारतीय मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा आणि त्यांचे फिजिओथेरपिस्ट तेसनीम झय्याद असतील.
त्यांच्या विमान प्रवासाचा खर्च, राहण्याचा आणि निवासाचा खर्च, वैद्यकीय विमा, स्थानिक वाहतूक खर्च, व्यायामशाळेचा खर्च आणि वैद्यकीय खर्च सरकार करेल.
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1932066)